शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘एचआयव्ही’चे सोलापूर जिल्ह्यात १८ हजार रूग्ण; ...शून्याकडे वाटचाल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 11:27 IST

रेषो ०़८६ टक्क्यांवर : धोकादायक आजारासह जगताहेत १८ हजारांवर रूग्ण

ठळक मुद्दे१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जात आहेजिल्ह्यात ‘एचआयव्ही’ बाधितांची संख्या ही १८,६६४ इतकी राज्यात सोलापूरचा चौथा क्रमांक

काशिनाथ वाघमारे सोलापूर : मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणाºया सोलापूरमध्ये मागील दहा वर्षांत एचआयव्ही बाधितांची संख्या ७ टक्क्यांवरून चक्क ०़८६ टक्क्यांवर आली आहे़ तरीही जिल्ह्यात ‘एचआयव्ही’ बाधितांची संख्या ही १८,६६४ इतकी आहे़ राज्यात सोलापूरचा चौथा क्रमांक लागत असून, आधुनिक उपचार प्रणालीचा लाभ लवकरात लवकर मिळत असल्याचा हा परिणाम आहे़ शून्य गाठण्याच्या दृष्टीने सोलापूरकडून पावले पडत आहेत़ 

१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जात आहे़ जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालय (डाबको) सोलापुरात सुरू झाल्यापासून पहिल्या स्थितीतील औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाली़ त्यानंतर झालेल्या पाठपुराव्यामुळे काही वर्षांतच दुसºया स्थितीतील प्रभावी औषधे उपलब्ध झाली़ डाबकोच्या पाठपुराव्यानंतर आता तिसºया स्थितीतील रुग्णांसाठी औषधे उपलब्ध होत आहेत. १ जानेवारीपासून तिसºया स्थितीतील रुग्णांसाठी औषधे उपलब्ध होत आहेत़ जिल्ह्यात एचआयव्ही बाधित पुरुषांची संख्या ही ५२ टक्के तर स्त्रियांची संख्या ही ४८ टक्क्यांवर पोहोचली आहे.

ठाणे, पुणे, नगर, कोल्हापूर आणि सांगली हे जिल्हे बाधितांमध्ये आघाडीवर आहेत.ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून प्रयत्न सुरू आहेत़ तसेच शासनाने उपचारासाठी बाधितांना ५० किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवासही मोफत दिला आहे़ काही दिवसांपासून ही योजना अमलात आली असून, एसटी बसच्या पासेसचेही वाटप सुरू झाले आहे़ तसेच अंत्योदय योजनेत बाधितांना सामावून घेण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांना आदेश दिले आहेत़ यामुळे मागील काही दिवसांत ५३० बाधितांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात डाबकोला यश आले. या योजनेंतर्गत प्रत्येकाला ३२ किलो धान्य उपलब्ध होत आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरHIV-AIDSएड्सHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल