हंगेरीतले १५ हजार डिजिटल मीटर बसणार सोलापूर शहरातील घरगुती नळांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 06:30 PM2021-11-22T18:30:01+5:302021-11-22T18:30:12+5:30

स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून पाहणी : स्मार्ट सिटी कार्यक्षेत्रात ‘जेवढे पाणी तेवढे बिल’

15,000 digital meters from Hungary will be installed on domestic pipes in Solapur city | हंगेरीतले १५ हजार डिजिटल मीटर बसणार सोलापूर शहरातील घरगुती नळांना

हंगेरीतले १५ हजार डिजिटल मीटर बसणार सोलापूर शहरातील घरगुती नळांना

googlenewsNext

साेलापूर -स्मार्ट सिटी एरियातील घरगुती नळांना हंगेरी येथील एका कंपनीचे मीटर बसविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच केरळ येथील ‘एफसीआरआय’ लॅबमध्ये १५०० मीटरची चाचणी घेतली.

स्मार्ट सिटी याेजनेतून शहराच्या मध्यवर्ती भागात नव्याने पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली. या भागात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याचा पालिकेचा दावा आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे माेजमाप ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी याेजनेतून १०० काेटी रुपये खर्चाची स्वयंचलित यंत्रणा (स्काडा) बसविण्याचे काम सुरू आहे. स्काडा सिस्टीम अंतर्गत शहराच्या मध्यवर्ती भागातील १५ हजार नळांना मीटर बसविण्यात येणार आहे. हे काम काेल्हापूरची एक कंपनी करीत आहे. या कंपनीने हंगेरी देशातील एका कंपनीतून पहिल्या टप्प्यात १५०० मीटरची खरेदी केली. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार केरळमधील तरल पदार्थ अनुसंधान संस्था (एफसीआरआय) मध्ये या मीटरची चाचणी घेण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, स्मार्ट सिटीचे तांंत्रिक सल्लागार तथा मुंबई आयआयटीचे अमित सक्सेना, साहील आमीन, स्मार्ट सिटीचे अभियंता उमर बागवान आदींंची उपस्थिती हाेती. लवकरच हे मीटर नळांना बसविण्यात येतील, असे धनशेट्टी यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

---

काेणत्या भागात किती पाणी हे कळणार

स्काडा प्रणालीव्दारे जलवितरण केंद्रातील पाइप, पाण्याच्या टाक्यांचे पाइप, घरगुती, व्यावसायिक वापराच्या नळांना मीटर बसविण्यात येणार आहेत. यामुळे काेणत्या भागात किती वेळ आणि किती पाणीपुरवठा हाेताे याची माहिती मिळणार आहे. मीटर बसविण्याचा खर्च मिळकत करातून वसूल हाेणार आहे.

Web Title: 15,000 digital meters from Hungary will be installed on domestic pipes in Solapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.