शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

सोलापूरातील सेवानिवृत्त कृषी अधिकाºयास १.४ कोटी रुपयांचा गंडा, दिल्लीच्या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:35 IST

निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी सखाराम केसकर यांच्याकडून विमा पॉलिसीचे हप्ते आणि नवीन पॉलिसीज्च्या नावाखाली १ कोटी ४ लाख रूपये उकळून फसवणूक केली.

ठळक मुद्देयाप्रकरणी दिल्लीच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. केसकर यांची ही फसवणूक  २०११ ते २०१८ दरम्यान करण्यात आली होती.विराज मल्होत्राने  फिर्यादी केसकर यांना  बिर्ला सनलाईफ, श्रीराम लाईफ इन्शुरन्स, भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स आणि एचडीएफसी लाईफ या विमा कंपनीच्या प्रत्येकी दोन पॉलिसी व श्रीराम लाईफ इन्शुरन्स या कंपनीच्या तीन पॉलिसी घेण्याची गळ घातली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३  :  निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी सखाराम केसकर यांच्याकडून विमा पॉलिसीचे हप्ते आणि नवीन पॉलिसीज्च्या नावाखाली १ कोटी ४ लाख रूपये उकळून फसवणूक केली. याप्रकरणी दिल्लीच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. केसकर यांची ही फसवणूक  २०११ ते २०१८ दरम्यान करण्यात आली होती. या प्रकरणी केसकर (वय ६४,रा. नई जिंदगी रोड) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून विराज मल्होत्रा (रा.गुडगाव नोएडा, दिल्ली), सुमित रंजन, आकाश बिडला, सुमित अग्रवाल, अंजली शर्मा, आरती नारंग, रिचा भटनागर व त्याचे इतर सहकाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विराज मल्होत्राने  फिर्यादी केसकर यांना  बिर्ला सनलाईफ, श्रीराम लाईफ इन्शुरन्स, भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स आणि एचडीएफसी लाईफ या विमा कंपनीच्या प्रत्येकी दोन पॉलिसी व श्रीराम लाईफ इन्शुरन्स या कंपनीच्या तीन पॉलिसी घेण्याची गळ घातली. आरोपीने केसकर यांना पॉलिसींची रक्कम आरोपींच्या बँक खात्यांवर भरावयास सांगितली. त्यानुसार केसकर यांनी गेल्या सात वर्षात  १ कोटी ४ लाख ८६ हजार ४७० रूपये  महाराष्ट्र बँक, ‘आयसीआयसीआय’ बँक व स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँकेच्या धनादेशाव्दारे त्यांच्या   बँक खात्यांवर आरटीजीएस/ एमईएफटी ‘डीडी’ व्दारे भरली शिवाय काही रक्कम रोख स्वरुपातही  भरली; मात्र आरोपींने ही रक्कम पॉलिसीज्मध्ये न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. त्यानंतर इन्शुरन्स कस्टमर बोनस डीपार्टमेंट या खात्याचे पॉलिसी मॅच्युअर असल्याचे  खोटे पत्र ई-मेलव्दारे पाठवून दिले. मात्र विमा कंपन्यांकडून कोणताही ई - मेल आला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपली फसवणूक झाली, हे  केसकर यांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी ही फिर्याद दिली.---------------------------फोन आला अन् फसवणुकीस सुरुवात- केसकर  हे कृषी खात्यात नोकरीस असताना आयकर सवलत मिळण्यासाठी मंदार देखणे (रा. रत्नागिरी) यांच्याकडे बिर्ला कंपनीची एक पॉलिसी घेतली होती. त्यावेळी मंदार यांच्यासोबत आलेले खांडेकर आणि जांभळे यांची ओळख फिर्यादीबरोबर झाली होती. फेब्रुवारी २०११ मध्ये विराज मल्होत्रा याने केसकर यांना दूरध्वनी करुन जांभळे आणि खांडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन संपर्क साधत असल्याचे सांगितले. - आपण  बिर्ला सनलाईफ आणि श्रीराम लाईफ इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स अ‍ॅडव्हायजर म्हणून काम करत असल्याचे मल्होत्रा याने केसकरांना सांगितले. आर्थिक लाभाचे अमीष दाखवून  वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसीज् मल्होत्राने  केसकर यांच्या गळी उतरविल्या आणि त्यांच्याकडून पैसे उकळून फसवणूक केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस