शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

आयआयटीसाठी सोलापूरचे १० विद्यार्थी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:05 IST

बाकलीवालचे सात, ए. डी. जोशी कॉलेजचे दोन तर वालचंद कॉलेजचा एक जणांचा समावेश

ठळक मुद्देहर्षवर्धन गांधी याने ८८४ वा रँक तर रोहित कौलगुड याने १७१९ वा रँक पटकावला़बाकलीवाल ट्युटोरियल्सचे सात विद्यार्थी या  परीक्षेसाठी पात्र

सोलापूर :  अखिल भारतीय स्तरावर अभियांत्रिकी प्रवेशपूर्वसाठी घेण्यात आलेल्या २०१८ जेईई मेन अ‍ॅडव्हान्सड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून,  या प्रवेशासाठी सोलापूरमधून १० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सोलापुरातील नामवंत अशा ए. डी. जोशी  ज्युनियर कॉलेजचे दोन  तर वालचंद कॉलेजच्या एका विद्यार्थ्याचा यामध्ये समावेश आहे.  या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाºया  बाकलीवाल ट्युटोरियल्सचे सात विद्यार्थी या  परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 

जुळे सोलापूरमधील ए. डी. जोशी ज्युनियर कॉलेजमधील तन्मय गायकवाड याने ३०३ वा रँक तर ऋतुजा वटकर याने १९०६ वा रँक पटकावला़ हे दोन्ही विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत़  या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  ए़ डी़जोशी यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला़ सचिव अमोल जोशी, सायली जोशी, प्राचार्य प्रवीण देशपांडे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले़ 

वालचंद कॉलेज आॅफ आर्ट्स अँड सायन्सचा जेईई - अ‍ॅडव्हान्सड नीट स्कॉलर बॅचचा विद्यार्थी साईश्रवण आऱ कोथूर याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित (पी़सी़एम़) या ग्रुपमध्ये १६५ गुण मिळवून ४२७० वा रँक प्राप्त केला आहे़ वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ़ रणजित गांधी यांनी साईश्रवण याचे कौतुक केले़ यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त पराग शहा, उपप्राचार्य संजय शहा, डॉ़ प्रा़ के़ आऱ राव, प्रा़ डॉ़ नितीन ग्रामोपाध्ये, प्रा़ देवेंद्र दरेगोल, समन्वयिका सारिका महिंद्रकर आदी उपस्थित होते़ 

बाकलीवाल ट्युटोरियलचे सात विद्यार्थी रँकमध्ये

  • - नीट-जेईई मेन अ‍ॅडव्हान्स परीक्षेत बाकलीवाल ट्युटोरियलचे सात विद्यार्थी रँकमध्ये उत्तीर्ण झाले़ या परीक्षेत प्रणव पागे याने २७५ वा क्रमांक पटकावला़ सेंटर हेड भारती शहा यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला़
  •  हर्षवर्धन गांधी याने ८८४ वा रँक तर रोहित कौलगुड याने १७१९ वा रँक पटकावला़ याबरोबरच गौरव जोशी ४१६५ वा रँक, सुमित शिंदे याने १९०१ वा रँक, अथर्व माशाळकर याने ६३८३ वा रँक तर विक्रांत पाटील याने ७०२४ वा रँक पटकावला़ 
  • यंदा बाकलीवाल ट्युटोरियलचे हे चौथे वर्ष आहे़ योगेश कबीर, अभिषेक सिन्हा, संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले़ सेंटरप्रमुख भारती शहा, विमल महादेव तांबडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला

अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा 

  •  विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अखिल भारतीय पातळीवर  गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना पात्र ठरवले जाते. या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी  सोलापुरात केवळ चार केंद्रे आहेत.  अतिशय अवघड अशी परीक्षा असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बुध्दीचा कस पणाला लागला जातो. 
टॅग्स :SolapurसोलापूरIIT Mumbaiआयआयटी मुंबई