शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
3
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
4
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
5
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
6
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
8
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
9
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
11
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
12
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
13
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
14
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
15
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
16
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
17
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
18
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
19
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

मानेगावातील नर्सशी संबधित 10 जण क्वारंटाईन, तर सोलापुरातील नर्सचा पती पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 9:49 AM

सोलापूर जिल्ह्यातील दोन नर्सेसच्या बाबतीत दोन वेगवेगळ्या घटना..

ठळक मुद्दे- सोलापुरातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली ६१- शहर व जिल्ह्यात ३ मे असणार संचारबंदी- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही राहणार बंद

सोलापूर : स्वतः चा जीव धोक्यात घालून संकट काळात रुग्णांची सेवा बजावणाऱ्या दोन नर्सेसच्या बाबतीतही दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.पहिली घटना माणेगावची आहे. चपळगांव (ता. अक्कलकोट) येथील आरोग्य केंद्रात सेवा देणारे खासगी रूग्णालयातील डॉक्टर कोरोना बाधित आढळले. या केंद्रातील नर्स सासरी म्हणजे मानेगाव (ता. बार्शी) येथे गेल्या होत्या. अक्षयतृतीयेचा सण त्यांनी सासूकडे साजरा केला. त्यावेळी त्यांना केंद्रातील डॉक्टराला कोरोना लागण झाल्याचे कळले. त्यामुळे सोमवारी सकाळी त्या चपळगावला परतल्या. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या १० जणांना क्वारंटाईन केले. तसेच त्यांच्याकडे घाणेगावचे पाहुणे आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आरोग्य विभागाने घाणेगावला जाऊन तेथील १० पाहुण्यांना मराठी शाळेच्या विलगीकरण कक्षात ठेवल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत गुंड यांनी दिली. मानेगावात कुणालाही कोरोनाची लागण झाली नसून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, दुसऱ्या नर्सची घटना सोलापुरातील आहे. सोलापूरच्या शासकीय रूग्णालयातून निवृत्त झालेल्या नर्सच्या पतीला त्रास होऊ लागल्याने दोनवेळा ते रूग्णालयात उपचारासाठी आले़ पण तेथील डॉक्टरांनी लक्षणे नाहीत म्हणून त्यांना परत पाठविल्याचे सांगण्यात आले़. शेवटी वैतागून मुलाने जवळच्या खासगीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़. या रूग्णालयाने स्वॅब तपासणीसाठी पाठविल्यानंतर २६ एप्रिल रोजी सारीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही आता क्वारंटाईन करण्यात आल्याचे सांगण्यात आले़.

पाटकूल येथील महिला पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या संपकार्तील लोकांना घरात अलगीकरण करण्यात आले आहे़. आतापर्यंत ३७२९ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले़. त्यापैकी १५५८ जणांचा कालावधी संपला आहे़. अद्याप २१७१ जण निगराणीखाली आहेत़. संस्थात्मक अलगीकरणात १६७५ व्यक्ती होत्या, त्यातील ९३५ लोकांचा कालावधी संपला आहे़ अद्याप ७४० जण निरीक्षणाखाली आहेत़ पाटकूल येथील महिला पंढरपुरातील एका खासगी रूग्णालयात बाळंत झाली़ त्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या खासगी रूग्णालयातील दोन डॉक्टरांसह १४ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ भिमाशंकर जमादार यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर