शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीसाठी १० लाख भाविक पंढरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 06:28 IST

वैष्णवांचा महासागर : संतांच्या पालख्यांसह सर्व दिंड्या दाखल

- प्रभू पुजारी।पंढरपूर :अनंत रूपाचे हे सार।अनंत तीर्थांचे माहेर।।अनंती अपार तो हा कटी।कर ठेवुनी उभा।।अनंत तीर्थांचे माहेर असलेल्या पंढरपुरात गेल्या अठ्ठावीस युगांपासून कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत असलेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी संत-सज्जनांच्या पालख्यांसमवेत हरिनामाचा जागर करत १० लाखांची वैष्णवांची मांदियाळी गुरुवारी पंढरीत दाखल झाली असून चंद्रभागेच्या वाळवंटाला जणू वैष्णवांचा महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

१२ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने संतांच्या सर्व पालख्यांसह सर्व दिंड्या ११ रोजी रात्री पंढरीत दाखल झाल्याग़ुरुवारी दर्शन रांगेत ५० हजारांपेक्षा जास्त वारकरी होते़ ६५ एकर परिसरात ३ लाख ५० हजार, मठ, मंदिर, धर्मशाळा या ठिकाणी १ लाख, शहरातील मोकळ्या जागेत तंबू उभारून राहिलेले ३ लाख, चंद्रभागा वाळवंटात दीड लाख आणि रस्त्यावरून ये-जा करणारे १ लाख असे एकूण १० लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात आहे़

पंढरीत दाखल होताच भाविकांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळतात़ सध्या चंद्रभागा नदीपात्रात भरपूर पाणी आहे़ त्यामुळे पहाटेपासून भाविकांची चंद्रभागा वाळवंटी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी दाटी होताना दिसत आहे़मराठा बांधवांतर्फेमुख्यमंत्र्यांचा सत्कारएकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरला आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह इतर काही नेते या वेळी उपस्थित होते.सत्कार करणारे लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यात लढा देणारे अनेक कार्यकर्ते सहभागी नाहीत, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे यांनी केला.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी