शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागरी वस्ती सुधारणातंर्गत सोलापूर जिल्ह्यात १० कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 12:28 IST

सोलापूर जिल्हा प्रशासन : निविदा प्रक्रियेला झाली सुरुवात

ठळक मुद्दे१० कोटी ८१ लाख रुपयांच्या कामांना मंजुरीबहुतांश कामांच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यातनगरपालिकांच्या हद्दीतील दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे मंजूर

सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८ नगरपालिका आणि २ नगरपंचायतींच्या क्षेत्रात १० कोटी ८१ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील बहुतांश कामांच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत नगरपालिकांच्या हद्दीतील दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जातात. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या कामांना मंजुरी देते. यंदाच्या वर्षी या कामांवरून राजकारणही पेटले होते. सोलापूर महापालिकेतील बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना लक्ष्य केले होते. 

पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे या कामांना मंजुरी मिळण्यास उशीर लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मागील महिन्यात या समितीची बैठक झाली. या सोलापूर महानगरपालिकेसह १० नगरपालिका क्षेत्रातील कामांना मंजुरी दिली आहे. नगरपालिकांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार कामे मंजूर करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी सांगितले. सर्वाधिक ३ कोटी ५ लाख रुपयांचा निधी बार्शी नगरपालिकेसाठी मंजूर करण्यात आला आहे. यानंतर अक्कलकोट नगरपालिकेला १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर   झाला आहे. यातील बहुतांश कामांची निविदा प्रक्रिया  अंतिम टप्प्यात असल्याचे पंकज जावळे यांनी सांगितले. 

पालिकांची उदासीनता- राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ऊर्जा बचतीसाठी एलईडी पथदिवे बसविण्याकरिता ईईएसएलसोबत करारनामा करावा, असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने ४ जून रोजी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सोलापूर महानगरपालिकेसह सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना यासंदर्भात आदेश दिले होते. परंतु, सोलापूर महानगरपालिका आणि बार्शी नगरपालिका वगळता इतर नगरपालिकांची या कामात उदासीनता असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. 

 नगरपालिकानिहाय मिळालेला निधी - बार्शी : ३ कोटी ५ लाख, पंढरपूर : ८४ लाख ११ हजार, अक्कलकोट : १ कोटी ३२ लाख, करमाळा : १ कोटी १७ लाख, कुर्डूवाडी : १ कोटी १९ लाख, सांगोला : ४९ लाख, मंगळवेढा : ९९ लाख, मोहोळ : ७३ लाख, माढा : ४९ लाख, माळशिरस : ४९ लाख.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय