यामध्ये संजय गांधी निराधार योजनेसाठी (सर्वसाधारण) २ कोटी ९० लाख ८३ हजार २४ रुपयांच्या प्राप्त अनुदानापैकी ३५९६ लाभार्थ्यांना २ कोटी ९० लाख ८ हजार २०० रुपये, संजय गांधी निराधार योजनेसाठी (अनुसूचित जाती) ३८ लाख २९ हजार ७६७ रुपयांच्या प्राप्त अनुदानापैकी ४८५ लाभार्थ्यांना ३८ लाख २९ हजार ६०० रुपये, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेसाठी (सर्वसाधारण) ४ कोटी २७ लाख ७९ हजार ९७४ रुपयांच्या प्राप्त अनुदानापैकी ५५२५ लाभार्थ्यांना ४ कोटी २० लाख ८० हजार १०० रुपये, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेसाठी (अनुसूचित जाती) ९४ लाख ७ हजार ६०० रुपयांच्या प्राप्त अनुदानापैकी १५०० लाभार्थ्यांना ९० लाख १९ हजार ५०० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेसाठी १ कोटी ६० लाख ७२ हजार ६०० रुपयांच्या प्राप्त अनुदानापैकी ४७२७ लाभार्थ्यांना १ कोटी ६० लाख ७० हजार ८०० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेसाठी ८ लाख २ हजार ९४६ रुपयाच्या प्राप्त अनुदानापैकी २१७ लाभार्थ्यांना ८ लाख २ हजार ४०० रुपये,
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनेसाठी ८६ हजार ६४९ रुपयांच्या प्राप्त अनुदानापैकी २६ लाभार्थ्यांना ८८ हजार ४०० रुपये, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी २ लाख २२ हजार रुपयांच्या प्राप्त अनुदानापैकी १४ लाभार्थ्यांना १ लाख ४० हजार रुपये अशा १६ हजार ९०० लाभार्थ्यांना सुमारे १० कोटी १० लाख ३९ हजार रुपये अनुदान वाटप केल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.
४३ प्रकरणे नामंजूर
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध आठ योजनेच्या माध्यमातून दिव्यांग, निराधार, वयोवृद्ध नागरिकांना दर महिना अनुदान वितरित केले जात आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सचिव तहसीलदार, तर सदस्य मुख्याधिकारी यांच्या समितीने संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत संजय गांधी योजनेसाठी १७२ पैकी १५७ प्रकरणे मंजूर झाली, तर १५ प्रकरणे नामंजूर झाली आहेत. श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी २९० पैकी २६२ प्रकरणे मंजूर झाली असून, २८ प्रकरणे नामंजूर झाली आहेत.