शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

"जर एखाद्याने पुन्हा लग्न केले तर काय...?"; गिऱ्हाईकने Zomatoला का विचारला असा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 14:34 IST

झोमॅटोने दिलेलं उत्तरही राहिलं चर्चेत

Zomato, Anniversary Funny Banter: सध्या भारतात काम सुलभ करण्यासाठी कंपन्या आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरत आहेत. परंतु हे तंत्रज्ञान वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण ते भावनांना फारसे प्राधान्य देत असते आणि केवळ दिलेल्या सूचनांचे पालन करते. झोमॅटोच्या बाबतीतही असेच काहीसे घडल्याचे दिसले. बेंगळुरूस्थित झोमॅटोचे ग्राहक शोभित बाकलीवाल यांनी ॲपमधील त्रुटीबद्दल सांगितले तेव्हा चर्चा सुरू झाली.

झोमॅटो ॲपमध्ये जन्मतारीख आणि लग्नाचा वाढदिवसाची तारीख टाकणे बंधनकारक होते, असे शोभितला आढळले. पण नंतर ते एडिट करता येणार नाही असेही दिसले. यावरून त्याने झोमॅटोला प्रश्न विचारला. सोशल मीडियावर एक विचित्र प्रश्न विचारत शोभितने झोमॅटोच्या ॲनिव्हर्सरी पॉलिसीबद्दल गमतीने विचारले, "जर एखाद्याने पुन्हा लग्न केले तर काय?"

झोमॅटोच्या ग्राहक सेवा खात्याने शोभितच्या प्रश्नाचे उत्तर दिले, जे खूप विचित्र होते. हा प्रश्न सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला. झोमॅटोने उत्तर दिले की, तुम्ही अँनिव्हर्सरी एडिट करू शकणार नाही आणि आम्ही लग्नविषयक सल्लागार बनणे अपेक्षित नाही. जर एखाद्याला चांगले जेवण हवे असेल तर, आम्ही नक्कीच देऊ.

झोमॅटोला काय म्हणायचे आहे असा प्रश्न सर्वांना पडला. अनेकांना Zomato चे हे उत्तर अजिबात आवडले नाही. एका युजरने म्हटले, "एआय तुमच्या व्यवसायासाठी हेच करते. झोमॅटो याआधी चमकदार आणि मजेदार जाहिरातींसाठी ओळखली जात होती." दुसरा म्हणाला, "हे सरळ ChatGPT वरून दिसते आहे." तिसऱ्याने सल्ला दिला, "झोमॅटोसारखा सोशल ब्रँड बनवण्यासाठी इतके वर्ष गेले, त्याची अशी वाट लावू नका. यासाठी कोणत्याही मोठ्या भाषा मॉडेलची (LLM) मदत घेऊ नका."

टॅग्स :Zomatoझोमॅटो