शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

हास्यास्पद Video: कोरोनावरचा राग, रेमो डिसूझावर निघाला! कोरियोग्राफर हसून हसून लोटपोट झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 11:05 IST

Man Mistakenly Calls Remdesivir as Remo D'souza: तुम्ही या आधीही सोशल मीडियावर या तरुणाचे स्थानिक प्रसार माध्यमांना बाईट देणारे, मोदींविरोधात बोलणारे व्हिडीओ पाहिले असतील. हा तरुण 500 रुपयांची लाचखोरी आणि रेमेसीवीर इंजेक्शनवर बोलत होता.

बॉलीवूडचा प्रसिद्ध डान्स कोरियोग्राफर आणि निर्माता रेमो डिसूझाला (Remo D’souza) मोठा धक्का बसला आहे. काहीही संबंध नसताना एका तरुणाने कोरोना संकटाचा राग त्याच्यावर काढला आहे. खुद्द रेमो डिसुझानेच त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Choreographer-director Remo D’souza lightened the mood for everyone on Thursday by sharing a funny video of a man calling the Remdesivir injection as ‘Remo D’souza’. )

रेमोने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. यामुळे रेमोवर राग काढणारा तरुणही खूप फेमस होऊ लागला आहे. झाले असे, या व्हिडीओमध्ये एक तरुण कोरोनासाठी वापरले जाणारे इंजेक्शन आणि लाचखोरीवर बोलत होता. यावेळी त्याने रागाने रेमो डिसुझाचे नाव घेतले. खरेतर त्याला रेमडेसीवीर इंजेक्शनचे (Remdesivir injection) नाव घ्यायचे होते. पहा हा व्हिडीओ, तुम्हाला हसू आवरणार नाही....

तुम्ही या आधीही सोशल मीडियावर या तरुणाचे स्थानिक प्रसार माध्यमांना बाईट देणारे, मोदींविरोधात बोलणारे व्हिडीओ पाहिले असतील. हा तरुण 500 रुपयांची लाचखोरी आणि रेमेसीवीर इंजेक्शनवर बोलत होता. यावेळी त्याने 500 रुपये तर आपल्या देशाचे अधिकारी लाच म्हणून खातात. सिप्ला कंपनीचे जे इंजेक्शन येतेय, 'रेमो डिसुझा' येतेय, त्याची किंमत 5000 रुपये आहे, आणि तुम्ही 500 रुपयांत देत आहात, असे तो म्हणाला. ही बाब तिथे उपस्थित कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, सोशल मीडियाने तो तरुण बोलताना चुकला हे लगेचच पकडले. हा व्हिडीओ रेमो डिसुझापर्यंत देखील पोहोचला आणि त्याला हसूही आवरले नाही. 

त्याने य़ा व्हिडीओचा शेवट मिस करू नका असे कॅप्शन लिहित हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच #justforlaugh असा हॅशटॅग वापरला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरRemo DSouzaरेमो डिसुझाSocial Mediaसोशल मीडिया