शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वजन करण्याच्या मशीननं झाली पतीच्या अफेअरची पोलखोल, महिलेने पोस्टमधून सांगितली कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:52 IST

Husband affair caught : काही महिला तर पतीला रंगेहाथ पकडतात. पण एका महिलेने आपल्या पतीचं अफेअर वेगळ्याच प्रकारे उघड केलं.

Husband affair caught : पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. जोपर्यंत विश्वास कायम आहे तोपर्यंत या नात्यात दरी निर्माण होत नाही. पण जेव्हा एक पार्टनर दुसऱ्याला दगा देत असेल तर दुसऱ्यानं सावध व्हायला हवं. अनेक अशा घटना समोर येत असतात, ज्यात महिलांनी आपल्या पतीच्या अफेअरची पोलखोल केलेली असते. काही महिला तर पतीला रंगेहाथ पकडतात. पण एका महिलेने आपल्या पतीचं अफेअर वेगळ्याच प्रकारे उघड केलं. आता दोघेही वेगळे राहू लागते आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण दरम्यान महिलेच्या मनात विचार आला घटस्फोट पुढे ढकलावा की नाही. पण तेव्हाच तिला पतीची एक हैराण करणारी बाब समजली. ज्यामुळे तिचा विश्वास पूर्णपणे उडाला. महिलेने पतीच्या घरातील डिजिटल वेट मशीनचा डेटा चेक केला आणि तिला फारच विचित्र असं काही आढळलं.

या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, टेक्नॉलॉजीमुळे आपलं जीवन तर सोपं झालंच आहे, सोबतच नात्यांचं सत्यही समोर येत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या महिलेने आपल्या पतीच्या दग्याचा छडा एका डिजिटल वेट मशीनच्या माध्यमातून लावला. रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिने एक फोटो शेअर करत सांगितलं की, ती पतीपासून वेगळी राहत होती. पण दोघांनी ठरवलं होतं की, यादरम्यान ते दुसऱ्या कुणाशी संबंध ठेवणार नाहीत. तेव्हाच असं काही समोर आलं की, तिचा संशय आणखीन वाढला.

महिलेने लिहिलं की, "मी एक दिवस सहज आमची डिजिटल वेट मशीनची मेमरी चेक करत होते आणि त्यात आढळून आलं की, त्या दिवशी रात्री उशीरा 12:25 आणि 12:26 वाजता दोन वेगवेगळे वजन नोंदवले गेले. दोन्ही वजन 120 पाउंड (जवळपास 54.5 किलो). पण त्या दिवशी मी तिथे नव्हती. घरी फक्त माझा पती होता".

पतीचं पितळ उघडं पडलं

महिलेने असंही सांगितलं की, ती स्वत: 120 पाउंडची नाहीये आणि वजन मोजण्याची ही वेळ फारच संशयास्पद होती. या माहितीमुळे तिला संशय आला की, एखाद्या दुसऱ्या महिलेने त्यावेळी घरात वजन केलं असेल. हा हा तिच्या पतीच्या दग्याचा ठोस पुरावा आहे. महिलेने लिहिलं की, तिचं आणि पतीचं नातं आधीपासून तणावाचं होतं. पतीच्या आधीच्या अफेअरनंतरही दोघे एकमेकांना वेळ देत होते. पण या वजनाच्या मेमरीनं वेगळं चित्र समोर आणलं. 

लोकांनी दिल्या प्रतिक्रिया

एका व्यक्तीनं महिलेला सल्ला दिला की, "त्याला सांगू नको की, तुला हे कळलंय, गपचूप वकिलासोबत बोल आणि पुढचा विचार कर". दुसऱ्यानं लिहिलं की, "हे दोन बॅक टू बॅक वजन आहेत, अर्थ स्पष्ट आहे की, तो आता दुसऱ्या महिलांना भेटत आहे. आता हे नातं संपव". अनेक लोकांनी महिलेच्या डिजिटल गुप्तहेरीचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके