कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अद्यापही अनेक कार्यालये सुरू झालेली नाहीत. अनेक कर्मचारी सध्याही घरूनच काम करत आहेत. अशातच काही मीटिंग वगैरे असतील तर त्या अॅप्सच्या सहाय्यानं घेण्यात येतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवऱ्याची झूम मीटिंग सुरू असतानाच त्याची पत्नी मध्ये येऊन त्याचा किस घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएस अधिकारी रूपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच त्याला वर्क फ्रॉम होम असा हॅशटॅगही दिलाय. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्याला हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर आल्याही त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
Viral Video : झूम मिटींग सुरू असतानाच पत्नी किस करायला आली आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 15:45 IST
Viral Video : व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय भन्नाट व्हायरल, आयपीएस अधिकाऱ्यानंही शेअर केला हा मजेशीर व्हिडीओ
Viral Video : झूम मिटींग सुरू असतानाच पत्नी किस करायला आली आणि...
ठळक मुद्देव्हिडीओ सोशल मीडियावर होतोय भन्नाट व्हायरलआयपीएस अधिकाऱ्यानंही शेअर केला हा मजेशीर व्हिडीओ