शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाईकच्या हॅंडलच्या कोपऱ्यावर का असतो 'हा' लोखंडी भाग? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:20 IST

एका व्यक्तीने व्हिडीओद्वारे याबाबत सांगितलं आहे. मोहम्मद दानिश नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर बरेच लोक वेगवेगळी माहिती देणारे व्हिडीओ शेअर करत असतात. ज्यात रोजच्या जीवनातील गोष्टींची माहिती दिली जाते. अनेक आपण रोज वापरत असलेल्या गोष्टींबाबतच आपल्याला माहीत नसतं. बाईकचा वापर रोज लोक करतात. बाईकच्या हॅंडलच्या कोपऱ्यावर एक लोखंडी भाग असतो. तुम्हीही बाईक चालवताना हा लोखंडी भाग अनेकदा पाहिला असेल. पण तो तिथे का असतो हे तुम्हाला माहीत नसेल.

एका व्यक्तीने व्हिडीओद्वारे याबाबत सांगितलं आहे. मोहम्मद दानिश नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. @mechanicaltechhindi नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने बाईकच्या हॅंडलच्या कोपऱ्यावर लोखंडी भाग असण्याची कारणं सांगितली आहे.

दानिशने सांगितलं की, बाईकच्या या लोखंडी भागाला बाईक बार एन्ड वेट्स असं म्हणतात. सामान्यपणे हा भाग लोखंडाचा असतो. याचे वेगवेगळे उद्देश आहे. पहिला म्हणजे बाईक चालत असताना जे व्हायब्रेशन होतं, ते या भागामुळे कमी होतं आणि नियंत्रण कायम राहतं. दुसरं कारण म्हणजे जेव्हा बाईक वेगाने धावत असते तेव्हा हॅंडल वेगामुळे हलत असतं. अशात हॅंडलचा कोपरा जड असल्याने हॅंडल कमी हलतं. आणखी एक मोठं कारण म्हणजे जेव्हा बाईक खाली पडते तेव्हा जमिनीसोबत सगळ्यात आधी हॅंडलचा संबंध येतो. या लोखंडी भागामुळे बाईकचं नुकसानही कमी होतं. 

या व्हिडिओला आतापर्यंत ५७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही लोक म्हणाले की, हा भाग काही बाईकमध्ये प्लास्टिकचा असतो. तर काही म्हणाले की, याने काहीच फरक पडत नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके