शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाव्हणं जेवला काय...! गाऊनवाल्या बाईंचा 'गौतमी' स्टाइल डान्स व्हायरल, अवधुत गुप्तेचंही 'स्टेटस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 16:28 IST

Social Viral: गाऊनवाल्या बाईंचा हा भन्नाट डान्स बघून तुमचीही पावलं थिरकली नाहीत तरच नवल!

सोशल मीडियावर एखादी गोष्ट लोकांच्या पसंतीस पडली, की ती व्हायरल व्हायला क्षणाचाही विलंब लागत नाही. ती गोष्ट व्हायरल होऊन थांबत नाही, तर तो ट्रेंड बनतो आणि फॉलोही केला जातो. असाच एका गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, तो आहे गाऊनवाल्या बाईंचा! हो हो! गाऊनवालीबाई असा  त्यांचा हॅशटॅगच आहे. 

अमरावतीच्या रश्मी सोनवणे या ताई घरगुती कपड्यांवर अर्थात गाऊनवर व्हिडीओ करतात, अपलोड करतात आणि ते व्हायरलही होतात. त्यात त्यांच्या अहोंचा आणि कौटुंबिक सदस्यांचाही सहभाग असतो. दैनंदिन जीवनातील छोटे मोठे प्रसंग, विनोद आणि त्यांची बेधडक नृत्यशैली लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. लॉक डाऊनमध्ये टिक टॉकपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास युट्युब, मौज, शेअर चॅटवर अविरत सुरु आहे. त्यांचे इंस्टाग्रामवर एक लाख चाळीस हजार फॉलोवर्स आहेत, तर फेसबुकवर एक लाख एकोणसाठ हजार फॉलोवर्स आहेत. 

अशातच त्यांनी केलेला एक व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की त्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आणि ते कमी म्हणून कि काय, तर गायक अवधूत गुप्ते यांनी तो व्हिडिओ आपल्या स्टेट्सला ठेवत त्यांचे कौतुकही केले आहे. तो व्हिडीओ नेमका कोणता ते पाहू-

गायिका राधा खुडे यांनी गायलेलं 'पाव्हणं जेवला काय?' हे गाणं काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालं. मात्र लावणी डान्सर गौतमी पाटील हिने त्या गाण्यावर डान्स केल्यापासून ते अधिक लोकप्रिय झालं. गाऊनवाल्या ताईंनी सहज म्हणून या गाण्यावर व्हिडीओ केला आणि इंस्टाग्राम व फेसबुकवर शेअर केला आणि त्यांच्या भन्नाट डान्स व्हिडीओने धुमाकूळच घातला! त्यांची बिनधास्त नृत्यशैली पाहूनच की काय, गायक अवधूत गुप्ते यांनाही तो व्हिडीओ स्टेट्सवर ठेवायचा मोह अनावर झाला असावा. एव्हाना व्हिडीओबद्दल तुमचीही उत्सुकता वाढली असेलच, तर बघा त्या व्हिडिओची झलक-

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलGautami Patilगौतमी पाटील