शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

Video: पुतण्याच्या लग्नाची मिरवणूक, माजी सरपंच काका बेभान; घराच्या छतावरून केली 100-500 च्या नोटांची बरसात अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 17:24 IST

यावेळी नोटा जमा करण्यासाठी त्यांच्या घराखाली मोठी गर्दी झाली होती. यावेळी लोकांमध्ये बाचाबाची झाली.

गुजरातमधील मेहराना येथे माजी सरपंचाने घराच्या छतावर उभे राहून नोटांची बरसात केली. कारण होतं पुतण्याचं लग्न. या माजी सरपंचाचे नाव आहे करीम यादव. ते केकरी तालुक्यातील अनगोळ गावचे माजी सरपंच आहेत. पुतण्याच्या लग्नाच्या वेळी त्यांनी घराच्या छतावर उभे राहून 100 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांची बरसात केली. यावेळी नोटा जमा करण्यासाठी त्यांच्या घराखाली मोठी गर्दी झाली होती. यावेळी लोकांमध्ये बाचाबाची झाली.

करीम यादव जेव्हा नोटांचा वर्षाव करत होते, तेव्हा त्यांच्या पुतण्याची मिरवणूक गावातून जात होती. यावेळी करीम यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण गावाला नोटा वाटले. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जोधा-अकबर चित्रपटातील अझिमो-शान शहेनशाह हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे.

माजी सरपंच करीम यादव यांचा भाऊ रसूल यांचा मुलगा रज्जाकचे लग्न अत्यंत धूमधडाक्यात झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गावभर मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय नोटांचा पाऊसही पडला. सायंकाळी गावातून मिरवणूक निघाली. यावेळी करीम यादव आणि त्यांचे नातेवाईक घराच्या छतावर पोहोचले आणि त्यांनी तेथे नोटांचा वर्षाव करायला सुरुवात केली. त्यांनी 10 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या नोटांचा वर्षाव केला. छताच्या आधी सरपंचाचे संपूर्ण कुटुंब नोटा उडवत होते, ते गोळा करण्यासाठी मोठा जमाव जमला होता. लग्नाच्या सोहळ्यात कुटुंबीयांनी लाखो रुपयांच्या नोटा उडवल्याचे सांगण्यात येत आहे. हे लग्न 16 फेब्रुवारीला झाले. केवळ गावातच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरात या लग्नाची चर्चा आहे.

टॅग्स :marriageलग्नGujaratगुजरातSocial Viralसोशल व्हायरल