शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

प्यारवाली लव्हस्टोरी! अखेर विशालला मिळाला कुसुमचा मेसेज, म्हणाला...; 10 रुपयांची नोट पुन्हा व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 12:11 IST

Vishal Reply To Kusum Rs 10 Note : कुसुमच्या मेसेजला विशालने उत्तर दिलं आहे. त्यासाठी त्याने देखील दहा रुपयांचीच नोट वापरली आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक भन्नाट गोष्टी या व्हायरल होत असतात. प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्यांचे किस्से देखील काही वेळी चर्चेचा विषय़ ठरतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दहा रुपयांच्या नोटेचा एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका तरुणीने तिचा प्रियकर विशालसाठी 10 रुपयांच्या नोटेवर एक मेसेज लिहून तिचं लग्न ठरलं असल्याचं सांगितलं. तसेच कुसुम नावाच्या तरुणीने संकटात सापडल्यावर प्रियकर विशालला तिच्या मदतीसाठी येण्याची विनंती देखील केली होती.

"विशाल, माझं लग्न 26 एप्रिलला आहे. मला इथून घेऊन जा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझी कुसुम" ही नोट खूप व्हायरल झाल्यानंतर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. 26 एप्रिलआधी कुसुमचा हा मेसेज विशालला पोहोचवला पाहिजे… प्रेमात असलेल्या दोन व्यक्तींनी एकत्र येणे आवश्यक आहे असं युजरने लिहिलं होतं. तसेच कृपया तुमच्या ओळखीच्या सर्व विशालला टॅग करा असंही सांगितलं होतं. त्यानंतर अनेक लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्व विशालला टॅग करत होते. यावर हटके प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. विशेष म्हणजे आता कुसुमचा मेसेज विशालला मिळाला असून 10 रुपयांची नोट पुन्हा एकदा जोरदार व्हायरल होत आहे. 

कुसुमच्या मेसेजला विशालने उत्तर दिलं आहे. त्यासाठी त्याने देखील दहा रुपयांचीच नोट वापरली आहे. ट्विटरवर 10 रुपयांच्या नोटेचा आणखी एक फोटो समोर आला आहे, विशालने कुसुमला नोटेच्या पाठीमागे निळ्या पेनने खास मेसेज लिहून उत्तर दिलं आहे. "कुसुम, मला तुझा मेसेज मिळाला आहे. मी तुला घ्यायला येईन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझा विशाल" असं म्हटलं आहे. खरंच विशाल कुसुमला घेऊन जाणार का? याविषयी आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल