शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कोहलीनं आज जितक्या धावा केल्या, तितका डिस्काऊंट...आज सर्वांना FREE दिली बिर्याणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 19:29 IST

विराट कोहलीनं न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी-फायनल सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधलं आपलं ५० वं शतक साजरं केलं.

मुजफ्फरनगर-

विराट कोहलीनं न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी-फायनल सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधलं आपलं ५० वं शतक साजरं केलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सुरु असलेल्या सामन्यात किंग कोहलीनं एकूण ११७ धावांची दमदार खेळी साकारली. उत्तर प्रदेशात कोहलीचा चाहता असलेल्या एका हॉटेल मालकानं तर आज चक्क विराट आज जितक्या धावा करेल तितका डिस्काऊंट देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आज त्याला ग्राहकांना मोफत बिर्याणी वाटप करावं लागलं. 

मुजफ्फरनगरच्या प्रसिद्ध 'हाजी मकबूल की तहरी' नावाच्या हॉटेलचे संचालक मोहम्मद दानिश रिजवान हा विराट कोहलीचा मोठा चाहता आहे. या वर्ल्डकपमध्ये त्यानं आपल्या ग्राहकांसाठी एक वेगळीच ऑफर दिली. किंग कोहली जितक्या धावा करेल तितका डिस्काऊंट दिली जाईल अशी घोषणा हॉटेल मालकानं केली होती. कोहलीनं आजच्या सामन्यात ११७ धावांची खेळी साकरली आणि हॉटेल मालक मोहम्मद रिझवान यांनी दिलेलं वचन पाळत ग्राहकांना चक्क फुकटात बिर्याणी खाऊ घातली आहे. 

याआधीही भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात कोहलीनं ८८ धावांची खेळी साकारली होती. त्यानुसार रिझवान यानं ६० रुपयांची चिकन बिर्याणी प्लेट चक्क ७ रुपयांना विकली. म्हणजेच बिर्याणीवर ८८ टक्के डिस्काऊंट दिला होता. आज मुंबईतील सामन्यात कोहलीनं ११७ दावा केल्या. तर त्यानं ग्राहकांना मोफत बिर्याणी वाटप केलं आहे. यासाठी तब्बल ४५० हून अधिक ग्राहकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. 

"वर्ल्डकपमध्ये भारताचा सामना कोणत्याही संघाविरुद्ध असला तरी आमची ऑफर सुरूच राहील. उलट मला तर वाटतं कोहलीनं द्विशतक ठोकावं आणि आम्हाला प्रत्येकाला दोन-दोन प्लेट बिर्याणी वाटता यावी. कारण मी त्याचा प्रचंड मोठा चाहता आहे. आतापर्यंत अनेक ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेतला आहे आणि तर रजिस्ट्रेशन केलेल्यांपैकी काही जण नंतर येऊनही डिस्काऊंटवर बिर्याणी खाऊ शकणार आहेत", असं हॉटेल मालक रिझवान यांनी सांगितलं.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहली