Viral Video: आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे की, लोक व्हायरल होण्यासाठी काहीही करत आहेत. विशेषतः तरुण वर्गात व्हायरल होण्याची क्रेझ वाढली आहे. यासाठी ते आपला जीव धोक्यात घालायलाही तयार आहेत. तुम्ही अशाप्रकारचे धोकादायक रील्स अनेकदा पाहिलेही असतील. सध्या अशाच एका धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तरुण चक्क धावत्या ट्रकखाली गेल्याचे दिसते.
व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक तरुण स्केटिंग करताना धावत्या ट्रकखाली घुसताना दिसतो. तर, त्याचा मित्र पाठीमागून त्याच्या या धोकादायक स्टंटचा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने त्या तरुणाला काही दुखापत झाली नाही. पण, एक छोटीशी चूक जीवावर बेतली असती. व्हिडिओ पाहून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हा व्हिडिओ X (पूर्वीचे ट्विटर) वर @mdtanveer87 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. काही क्षणांतच हजारो लोकांनी तो पाहिला, लाईक केला आणि शेअर केला. अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला. एका युजरने लिहिले, रीलसाठी जीव का धोक्यात घातोय? तर दुसऱ्याने म्हटले, काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी आयुष्याशी खेळणं थांबवा. अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अशा धोकादायक कंटेंटवर निर्बंध आणण्याची मागणीही केली.