शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Viral Video: मुलगा कारखाली आला तरी 'तिला' कळलंच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 17:33 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेला भयंकर व्हिडीओ पाहून नेटकरी उद्विग्न झालेत, संतापलेत. हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटा येतो.

एका सोसायटीच्या आवारात मुलं फुटबॉल खेळताहेत. एक महिला येते. कार सुरू करते. कारच्या जवळच एक मुलगा बुटाची लेस बांधत असतो. तो तिला दिसत नाही. त्याला कारची धडक बसते, तो कारसोबत काही फूट फरफटत जातो आणि नंतर कारखालीही येतो. तरीसुद्धा या महिलेला काहीच कळत नाही, ती स्वतःच्याच धुंदीत निघून जाते. सुदैवाने मुलगा बचावतो आणि घाबरून धावत-धावत मित्रांजवळ जातो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी उद्विग्न झालेत, संतापलेत. हा व्हिडीओ पाहताना क्षणभर अंगावर काटा येतो. दैव बलवत्तर म्हणून मुलगा वाचल्याचं पाहून हायसं वाटतं, पण या महिलेला ड्रायव्हिंग लायसन्स दिलं कुणी आणि कसं, असा सवाल प्रत्येकाच्या मनात येतो. विविध व्हॉट्स अॅप ग्रूपवर हा व्हिडीओ फिरतोय.  ही बाई आंधळी आहे का?, अशा स्वरूपाच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

हा व्हिडीओ नेमका कुठला हे कळू शकलेलं नाही. ठाण्याच्या वर्तक नगरमधील सोसायटीत हा प्रकार घडल्याचं काहींचं म्हणणं आहे. परंतु, 'लोकमत डॉट कॉम'ने ठाणे पोलिसांची संपर्क साधला असता, ही घटना ठाण्यातील नसल्याचं जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक नारकर यांनी स्पष्ट केलंय. स्थळ-काळाबद्दल निश्चित माहिती अद्याप मिळाली नसली, तरी हा व्हिडीओ पाहून पालकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया