Handsome TTE Viral Video : ट्रेनचा प्रवास हा अतिशय सुखकर प्रवास असल्याचे म्हटले जाते. दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. अशावेळी तुमच्याकडे जर तिकीट नसेल आणि अचानक टीसी आला तर मात्र मोठी पंचाईत होते. मात्र, या ट्रेनमध्ये एक असा टीसी आला ज्याला बघून सगळेच फिदा झाले. एका तरुणीने तर या हँडसम टीसीचा व्हिडीओ देखील काढला. सध्या सोशल मीडियावर या टीटीईचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या टीटीईचं रूप बघून ट्रेनमधल्या सगळ्याच तरुणी जवळपास आपलं हृदय हरवून बसल्या आहेत. असा तिकीट चेकर असेल, तर आम्ही रोज याच ट्रेनने प्रवास करू असे या तरुणीने म्हटले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हा टीटीई एसी कोचमध्ये तिकिटे तपासताना दिसत आहे. हा टीसी दिसायला खूपच देखणा आहे आणि त्याचे व्यक्तिमत्त्व देखील उत्तम आहे. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर अरिजित सिंहचे प्रसिद्ध गाणे 'अखियां मिलावंगा' यामुळे हा व्हिडीओ आणखी खास बनला आहे. आता, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच, हा टीटीई रातोरात स्टार झाला आहे. असा दावा केला जात आहे की, हा टीटीई शताब्दी एक्सप्रेसचा आहे, कारण व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने पोस्टमध्ये #ShatabdiExpress हा हॅशटॅग वापरला आहे.
टीटीईचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर foodwithepshi नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ३५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ९३ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक देखील केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने गंमतीने लिहिले, 'खिडकीतून तिकीट फेकून दे, मग तो तुला पकडून घेऊन जाईल', तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'ताई, हा सरकारी कर्मचारी आहे.. त्याला खूप सुंदर बायको मिळेल. तू स्वप्न पाहू नकोस'. त्याचप्रमाणे, एकाने कमेंट केली, 'सरकारी कर्मचाऱ्याला कधीही कमी लेखू नको', तर दुसऱ्याने लिहिले, 'तुम्हीही या टीटीईमुळे प्रसिद्ध झालात'.
एकंदरीत, या व्हायरल व्हिडीओने हे सिद्ध केले आहे की आयुष्यातील सर्वात सामान्य क्षण देखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येऊ शकतात. हा तिकीट तपासणी करणारा टीटीई आता नेटिझन्सच्या दृष्टीने एक नवीन इंटरनेट सेन्सेशन बनला आहे.