Viral Video : व्यक्ती प्रेमात पडल्यावर आंधळी होते असं म्हटलं जातं. पण सद्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून असं वाटतं की, व्यक्ती प्रेमात पडल्यावर आंधळी होण्यासोबतच बहिरी सुद्धा होते. उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये एक तरूण रेल्वे ट्रॅकवर बसून फोनवर बोलण्यात मग्न होता. तेव्हाच रेल्वेचं इंजिन येतं. पण व्यक्तीला रेल्वेचा हॉर्नही ऐकू येत नाही. पण त्यानंतर रेल्वेच्या लोको पायलटनं जे केलं, ते बघून सगळेच अवाक् झालेत.
काही सेकंदाच्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, तरूण रेल्वे ट्रॅकवर बसून फोनवर बोलत आहे. त्याला याचीही भीती नाही की, रेल्वे येईल. मागून येणाऱ्या रेल्वेन्या लोको पायलटनं अनेक हॉर्नही वाजवला. पण तरूण त्याकडे काही लक्ष देत नाही.
शेवटी लोको पायलटला रेल्वेचं इंजिन थांबवावं लागतं. जेव्हा तरूणानं पाहिलं की, रेल्वेचं इंजिन त्याच्या जवळ येऊन थांबलं आहे. तेव्हा तो बाजूला झाला. यानंतर संतापलेल्या लोको पायलटनं खाली उतरून तरूणाकडे एक दगड भिरकावला. तरूण घाबरून तिथून पळून गेला.
@army_lover_ajay_yadav_ghzipur नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टला आतापर्यंत ९९ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि ५३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो यूजर्सनी या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं की, 'अशा लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे.