शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चरणामृत समजून भाविक प्यायले एसीचं पाणी, बांके बिहारी मंदिरातील व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 11:45 IST

Viral Video: भाविकांची अशी धारणा आहे की, हे पाणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणांमधून निघालेलं चरणामृत आहे. हा सगळा प्रकार बांके बिहारी मंदिरात समोर आला.

Viral Video: उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये वृंदावनच्या एका प्रसिद्ध मंदिरात हत्तीच्या मूर्तीच्या तोंडातून येणारं पाणी पिण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. भाविकांची अशी धारणा आहे की, हे पाणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणांमधून निघालेलं चरणामृत आहे. हा सगळा प्रकार बांके बिहारी मंदिरात समोर आला. याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, भाविक भिंतीवरील हत्तीच्या मूर्तीच्या तोंडात येणारं पाणी पित आहे. डोक्यावर घेत आहेत. एका रिपोर्टनुसार, हे पाणी हत्तीच्या आकाराच्या पाईपमधून वाहत होतं, जे मंदिराच्या वास्तुकलेचा भाग आहे.

मात्र, ज्या पाण्याला भाविक चरणामृत समजत होते, ते मुळात एसीमधून निघणारं डिस्चार्ज वॉटर म्हणजे पाणी आहे. व्हिडिओत एक व्यक्ती काही भाविकांना हे सांगताना ऐकू येत आहे की, जे पाणी तुम्ही पित आहात ते मुळात एसीचं पाणी आहे. या व्यक्तीने सांगितल्यानंतरही लोक हे पाणी पित राहिले आणि अंगावर शिंपडत राहिले. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला एक्सवर २.८ मिलियन वेळा बघण्यात आलं आहे. तर व्हिडिओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये यूजर्सनी भाविकांच्या या अंधश्रद्धेवर कमेंट्स केल्या आहेत. तसेच लोकांमध्ये असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाची कमतरता याबाबतही कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की, "कुणीही एक सेकंद थांबून हा विचार करत नाहीये की, हे काय होत आहे? ही कसली मानसिकता आहे". 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके