शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टमध्ये श्वानाला अमानुष मारहाण; CCTV ने केली पोलखोल, नेटकऱ्यांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:04 IST

सोशल मीडियावर पाळीव श्वानाला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. 

Social Viral : नुकताच सोशल मीडियावर गोल्डन रिट्रीवर प्रजातीच्या एका श्वानाला अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. इंटरनेटवर एखाद्या श्वानाने माणसांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ किंवा रिल्स बऱ्याच जणांनी पाहिले असतील. दिल्ली, नोएडा याांसारख्या शहरांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रश्न ऐरणीवर आहेत. त्यातच या व्हिडिओमुळे श्वान प्रेमींमध्ये संतापाचा सुर उमटला आहे. 

सध्या एक्सवर India Unites For animals Rights नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.  या व्हायरल व्हिडिओमध्ये डॉग वॉकर त्या पाळीव श्वानाला लिफ्टमध्ये बेदम मारहाण करतोय. त्या श्वानाला लिफ्टमधून घरी नेत असताना त्याने केलेलं हे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे. 

हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाळीव श्वानाला लिफ्टमध्ये घेऊन जाताना दिसत आहे.  तेव्हा तो माणूस निर्दयीपणे गोल्डन रिट्रीट प्रजातीच्या पाळीव कुत्र्याला पट्ट्याने  मारहाण करतो. जोपर्यंत लिफ्टचा दरवाजा उघडला जात नाही तोपर्यंत तो माणूस श्वानाला मारतो. लिफ्टचा  दरवाजा खुलताच काही तो काहीच झालं नसल्याचा बनाव करत तो लिफ्टमधून बाहेर पडतो. 

व्हायरल व्हिडिओ पाहून तो माणूस श्वानाला बाहेर फिरायला गेऊ गेल्याचा अंदाज लावला जात आहे. पण काही कारणावरून तो व्यक्ती श्वानावर आपला राग काढतोय. दरम्यान, हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

रिपोर्टनुसार, घटनेच्या माहिती मिळताच त्या माणसाला कामावरून काढण्यात आल्याचं सागंण्यात येत आहे.  एका मुक्या प्राण्यासोबत असं निर्दयीपणे कोणीच वागू शकत नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया