शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:53 IST

monkey trekker viral video: हरिहर किल्ल्यावर चढताना ट्रेकरला हा अनुभव आला.

monkey trekker viral video: सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. तरुणाईपासून ते मोठ्यापर्यंत पावसाळ्यात सारेच वीकेंडला बाहेर भटकंती करायला जातात. निसर्गाच्या सानिध्यात, एखाद्या धबधब्यावर किंवा ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यादरम्यान प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. पण कधीकधी मजा-मस्ती करायला गेलेल्या एखाद्या माणसासोबत विचित्र गोष्टही घडते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात तो माकडामुळेट्रेकिंग करणारा थोडासा घाबरताना दिसतो. त्यानंतर माकडही अजबच कृत्य करतो.

माकड हा प्राणी त्याच्या खोडसाळपणासाठी ओळखला जातो. संधी मिळताच तो लोकांना त्रास देतो. निसर्गरम्य ठिकाणी माकडं लोकांना त्रास देताना दिसतात. असाच काहीसा प्रकार एकेठिकाी घडला. एका माकडाने ट्रेकिंग करणाऱ्या व्यक्तीला आपले लक्ष्य बनवले. व्हिडिओमध्ये दिसते की, एक माणूस टेकडीवर चढत आहे आणि यादरम्यान त्याच्यासोबत बरेच लोक आहेत. यादरम्यान एक माकड त्याच्या जवळ येतो. तो माणूस माकडाला हटकतो. ते पाहून माकडाला राग येतो आणि तो त्याला त्रास देतो. त्यानंतर माकड त्या माणसाची बॅग उघडतो आणि सर्व कपडे खाली फेकून देऊ लागतो. बॅगेत काही खायला आहे का, या विचाराने माकड असे करतो असे बोलले जातेय. पण माकडाला काहीच मिळत नाही. पाहा व्हिडीओ-

त्यापुढे माकड तरूणाच्या पाठीवर चढतो आणि त्याला खूप त्रास देते. पुढे आणि खाली असलेले लोक त्या तरूणाला शांतपणे तिथेच दगड पकडून राहण्याचा सल्ला देतात. यादरम्यान माकड एकदा त्या तरूणाला चावण्याचाही प्रयत्न करतो. पण अखेर तो तरूण सुखरूप या प्रसंगातून वाचतो.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर mr_manish_kharte_05 नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. तो पाहिल्यानंतर लोक त्यावर कमेंट करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे की माकडाने त्या माणसाला त्रास दिला. दुसऱ्याने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की माकड इथे त्या माणसासोबत खेळत आहे. तर आणखी एकाने कमेंट केली की, विनाकारण कधीही कोणाला हटकू नये.

टॅग्स :Trekkingट्रेकिंगMonkeyमाकडViral Videoव्हायरल व्हिडिओ