शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास रे पठ्ठ्या! वासराला वाचवण्याची तरूणाची धडपड, व्हिडीओ बघून कराल कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:33 IST

Viral Video : नाल्यात पडलेल्या गायीच्या वासराला बाहेर काढण्यासाठी एका तरूणाची धडपड या व्हिडिओत बघायला मिळते.

Viral Video : जगात आजही माणूसकी जिवंत असल्याचा पुरावा देणाऱ्या घटना वेळोवेळी समोर येत असतात. या घटना बघून लोकांनाही मदतीची प्रेरणा मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नाल्यात पडलेल्या गायीच्या वासराला बाहेर काढण्यासाठी एका तरूणाची धडपड या व्हिडिओत बघायला मिळते. या वासराला बाहेर काढण्यासाठी तरूणानं पूर्ण ताकद लावली असल्याचं बघू शकता.

व्हिडिओत बघू शकता की, तरूण काही लोकांच्या मदतीनं नाल्यात पडलेल्या वासराला बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. दोराच्या माध्यमातून वासराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यात यश न मिळाल्यानं तरूणानं थेट नाल्यात उडी घेतली आणि वासराला सुरक्षित बाहेर काढत त्याचा जीव वाचवला. 

इन्स्टाग्राम अकाऊंट veera singam वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत या व्हिडिओला २१ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. Its alive असं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. तर लोक या तरूणाचं भरभरून कौतुक करत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, हीच खरी माणूसकी आहे आणि जगाला अशा लोकांची खूप गरज आहे. तर अनेकांनी गायीला वाचवल्याबद्दल त्याचे धन्यवादही मानले.

हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला. खरंतर जगात प्राण्यांवर प्रेम करणारे खूप लोक आहेत. पण रस्त्यावर जर एखादा प्राणी अडचणीत असेल तर त्याची मदत करायला क्वचितच कुणी जातं. मात्र, या तरूणानं त्या धाडसानं या गायीला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला तो खरंच कौतुकास्पदच आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके