शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर खेळत असलेल्या मुलामागे लागला किंग कोब्रा, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 14:47 IST

Viral Video of King Cobra : एक लहान मुलगा घरातील व्हरांड्यात खेळत आहे. तेव्हाच अचानक त्याच्या आजोबांची नजर त्याच्याकडे येत असलेल्या किंग कोब्राकडे जाते. सापाला बघताच ते मुलाला जवळ घेतात आणि घरात जातात. 

व्हिएतनाममधील (Vietnam)  एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. व्हिडीओत एक ६.५ फूटांपेक्षा अधिक लांबीचा किंग कोब्रा (King Cobra) साप घराच्या यार्डमध्ये खेळत असलेल्या लहान मुलाच्या मागे लागला. वेळीच जर घरातील लोक मुलाला घेऊन पळाले नसते तर काहीही होऊ शकलं असतं. या व्हिडीओत (Viral Video Of King Cobra) तुम्ही बघू शकता की, एक लहान मुलगा घरातील व्हरांड्यात खेळत आहे. तेव्हाच अचानक त्याच्या आजोबांची नजर त्याच्याकडे येत असलेल्या किंग कोब्राकडे जाते. सापाला बघताच ते मुलाला जवळ घेतात आणि घरात जातात. 

तुम्ही बघू शकता की, किंग कोब्रा वेगाने सरपटत घराच्या दारापर्यंत पोहोचतो. पण कोब्रा आत शिरायच्या आधी व्यक्ती दरवाजा बंद करतो. कोब्रा काही वेळ दाराजवळ रागात इकडे-तिकडे करतो आणि नंतर बाहेरच्या दिशेने जाऊ लागतो. तुम्ही व्हिडीओत बघू शकता की कोब्राचा स्पीड खूप जास्त आहे. तो वेगाने सरपटत आहे. (हे पण वाचा : जगातल्या सर्वात विषारी कोब्राला किस करत होता सापांचा एक्सपर्ट, २ मिनिटांमध्ये झाला त्याचा खेळ खल्लास)

किंग कोब्राचा इतका खतरनाक व्हिडीओ तुम्ही कदाचित याआधी पाहिला नसेल. कोब्राचा स्पीड पाहून अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांच्या भरभरून कमेंटही येत आहे. ही घटना १४ जुलैची असून व्हिएतनामच्या सोक ट्रांग प्रांतातील आहे. या व्हिडीओतून हेही शिकायला मिळतं की लहान मुलांना एकटं सोडून जाऊ नका.  

टॅग्स :VietnamविएतनामsnakeसापSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके