Chicken Dog Fight Video: सोशल मीडियावर नेहमीच कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मनाला भावणारे तर काही हैराण करणारे असतात. सध्या एक सर्वांचं लक्ष वेधून घेत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका कुत्र्याची आणि कोंबड्याची लढाई बघायला मिळते. तुम्ही कुत्रे आणि कोंबड्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण असा नक्कीच पाहिला नसेल. अशात या दोघांच्या भांडणात बाजी कोण मारतं हे तर तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल.
व्हायरल झालेला कुत्रा आणि कोंबड्याच्या लढाईचा हा व्हिडीओ ४६ सेकंदाचा आहे. दोघेही पूर्ण ताकदीने एकमेकांशी भांडत आहेत. साधारण २० सेकंद कुत्रा कोंबड्यासोबत भांडतो. पण नंतर थकून माघार घेतो. कुत्रा पळायला लागल्यावर कोंबडा त्याचा पाठलाग करतो आणि पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला करतो. कोंबड्याचा राग पाहून कुत्रा वैतागतो आणि तिथून पळून जाऊ लागतो. मात्र, कोंबडा त्याला तरीही सोडायला तयार नाही. पुन्हा कोंबडा हल्ला करतो.
व्हिडिओत बघायला मिळतं की, कुत्रा पूर्ण ताकदीने कोंबड्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. पण जसजसं भांडण वाढतं, त्याची हिंमत कमी पडू लागते. कोंबडा काही त्याला सहजपणे जिंकू देत नाही. शेवटी कुत्रा हार मानून निघून जातो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला असून लोकांनी कोंबड्याची हिंमतीला खूप दाद दिली आहे.
@viral_noni_36garh नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी यावर कमेंट्स करून कोंबड्याचं कौतुक केलं आहे.