शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:29 IST

​​​​​​​Anatoly weight lifiting prank video viral: ​​​​​​​'अनाटोली'चा प्रँक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Anatoly weight lifiting prank video viral: सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे आपल्याला काहीतरी शिकवण देतात. कोणत्याही व्यक्तीच्या कपड्यांवरून किंवा कामावरून त्याच्या क्षमतेचा अंदाज लावू नये, असे अनेकदा बोलले जाते. सध्या असाच एक 'जिम प्रँक' व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये एका साध्या सफाई कामगाराच्या वेशातील व्यक्ती तगड्या बॉडीबिल्डर्सची बोलती बंद करताना दिसतो.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

हा व्हिडिओ प्रसिद्ध युक्रेनियन पावरलिफ्टर 'वलोडिमिर श्मोन्डेंको' (Volodymyr Shmondenko) याचा आहे. त्याला जगभरात 'अनाटोली' (Anatoly) या नावाने ओळखले जाते. अनाटोली जिममध्ये सफाई कामगाराचे कपडे घालून जातो. ताज्या व्हिडिओमध्ये, काही बॉडीबिल्डर्स जिममध्ये जड वजन (Weights) उचलण्याचा सराव करत असतात. अनाटोली तिथे लादी पुसण्याचे काम करत असतो. त्याला पाहून बॉडीबिल्डर्स त्याची चेष्टा करू लागतात. अनाटोली मुद्दाम आधी फार अनुभवी नसल्यासारखे वागतो आणि जड वजन उचलण्याचा प्रयत्न करताना खाली पडण्याचे नाटक करतो. हे पाहून बॉडीबिल्डर्स हसतात आणि म्हणतात की, हे तुला जमणार नाही, तू फक्त सफाईकाम कर.

इथे फिरला 'गेम'

थोड्या वेळानंतर गोष्टी बदलतात. जे वजन उचलण्यासाठी तगड्या बॉडीबिल्डर्सना घाम फुटत होता, तेच वजन अनाटोली सहज उचलतो. एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा तो वजन उचलून खाली ठेवतो. हे पाहून तिथल्या बॉडीबिल्डर्सच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. आपण ज्या व्यक्तीची काही वेळापूर्वी चेष्टा करत होतो, तो लय भारी असल्याचे कळताच ते अवाक् होतात.

दरम्यान, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @vladimirshmondenko या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला ३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनाटोलीच्या या व्हिडीओवर लोकांना कमेंट करत म्हटले आहे की, हा खरा 'इगो डिस्ट्रॉयर' आहे. सारेच लोक यात अनाटोलीचे कौतुक करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bodybuilders Mock Cleaner, Then He Shocks Them: Viral Video

Web Summary : Bodybuilders mocked a gym cleaner, Anatoly, for his apparent weakness. He surprised them by lifting heavy weights effortlessly. The video highlights judging people based on appearance.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया