लग्नातील हुंडापद्धत कायद्याने बंद झाली असली, तरी काही ठिकाणी गिफ्टच्या स्वरूपात हुंडा घेतला जात असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. इतकंच नाही तर, वधू पक्षाने वर पक्षाच्या मागण्या पूर्ण न केल्याने लग्न मोडल्याच्या घटना देखील समोर येत असतात. काही वेळा तर, अशा घटना सोशल मीडियावर देखील चर्चेत येत असतात. आता एका नवरदेवाने लग्नाच्या आधीच सासरच्या लोकांसमोर अशा काही मागण्या ठेवल्या, ज्या बघून आणि वाचून वधूपित्याच्या डोळ्यांत पाणी आले आहे. आता ही मागण्यांची यादी सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे या मागण्यांची यादी वाचून सगळेच वराचे कौतुक करत आहेत.
आजकाल विवाहसोहळे म्हणजे केवळ दोन जीवांचे मीलन नसून, तो एक भव्य इव्हेंट बनला आहे. मात्र, या इव्हेंटच्या गर्दीत लग्नाचा मूळ अर्थ कुठेतरी हरवून जातोय, असे मत अनेकजण व्यक्त करतात. नेमक्या याच मॉडर्न ट्रेंड्सना आव्हान देणाऱ्या एका नवरदेवाची कहाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या नवरदेवाने आपल्या लग्नाआधी ऐनवेळी सासऱ्यांच्या हातात १० मुद्द्यांची डिमांड लिस्ट सोपवली, जी वाचून सासऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर आलेच, पण सोशल मीडियानेही त्याचे कौतुक केले आहे.
एक्सवर ही पोस्ट तुफान व्हायरल झाली असून, लाखो लोकांनी ती पाहिली आहे. नेटकऱ्यांनी या नवरदेवाला 'विवाह परंपरेला सन्मान मिळवून देणारा खरा हिरो' म्हटले आहे. नवरदेवाचे म्हणणे स्पष्ट होते, "लग्नाचा दिवस हा सोशल मीडियासाठी नाही, तो आपल्या खासगी आणि महत्त्वाच्या क्षणांसाठी आहे."
नवरदेवाच्या १० अनोख्या मागण्या काय?
या नवरदेवाने मागणी केलेल्या गोष्टी वाचून तुम्हालाही त्याचे कौतुक करावे वाटेल. मागण्यांची यादी :
प्री-वेडिंग शूट नाही: लग्नाआधी केले जाणारे 'प्री-वेडिंग फोटोशूट' नको.
लेहंग्याला 'नो': वधूने भरजरी लहेंगा न घालता, साधी साडी परिधान करावी.
सॉफ्ट म्युझिक: डीजेचा दणदणाट आणि अश्लील गाणी नको, केवळ सॉफ्ट इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजवावे.
स्टेजवर फक्त दोघे: वरमालेच्या वेळी स्टेजवर फक्त नवरदेव-नवरी असतील. इतर कुणीही नसावे.
उचलायचे नाही: हार घालतानाच्या वेळी नवरदेव किंवा नवरीला कोणीही खांद्यावर उचलणार नाही.
पंडितांना त्रास नको: विधी करणाऱ्या पंडितजींना कोणीही मध्ये बोलून व्यत्यय आणणार नाही.
फोटोग्राफर दूरून क्लिक करतील: फोटोग्राफरने विधींच्या वेळी दूरून फोटो घ्यावेत, मध्ये येऊन अडथळा आणू नये.
जबरदस्तीने पोझ नाही: नवरदेव-नवरीला जबरदस्तीने पोझ देण्यासाठी कोणीही सांगणार नाही.
लग्न दिवसा, पाठवणी सायंकाळी: लग्न दिवसा होईल आणि पाठवणी सायंकाळी होईल, जेणेकरून रात्री उशिरापर्यंत पाहुण्यांना थांबावे लागणार नाही.
किससाठी आग्रह नको: कोणीही नवरदेव-नवरीला किस करण्यासाठी किंवा तसे पोझ देण्यासाठी आग्रह करणार नाही.
नवरदेवाच्या विचारांनी सासऱ्यांचे डोळे पाणावले!
सूत्रांनुसार, जावयाच्या या १० मुद्द्यांची लिस्ट वाचल्यावर सासरेबुवा भावूक झाले. मुलाच्या या पारंपरिक आणि साधेपणावर भर देणाऱ्या विचारांनी त्यांचे मन जिंकले. एका बाजूला सोशल मीडिया यूजर्स या संस्कारी जावयाचे कौतुक करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अनेक पालक 'असा जावई मिळायला भाग्य लागते' असे म्हणत त्याला असली हिरो म्हणून शुभेच्छा देत आहेत.
Web Summary : Upholding tradition, a groom's list of ten requests, prioritizing simplicity and respect over extravagance, moved his father-in-law to tears. His demands included no pre-wedding shoot, a simple saree for the bride, and minimal social media involvement, earning him praise as a true hero.
Web Summary : परंपरा को कायम रखते हुए, एक दूल्हे की दस मांगों की सूची, जो असाधारणता पर सादगी और सम्मान को प्राथमिकता देती है, ने उसके ससुर को रुला दिया। उनकी मांगों में कोई प्री-वेडिंग शूट नहीं, दुल्हन के लिए एक साधारण साड़ी और कम से कम सोशल मीडिया की भागीदारी शामिल थी, जिससे उन्हें एक सच्चे नायक के रूप में प्रशंसा मिली।