सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ लोकांना हसवतात, तर काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला लावतात. पण, सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एका नवऱ्याने आपल्या पत्नीच्या प्रियकराला बेडमध्ये लपून बसलेला असताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे पतीने अचानक बेडरूममध्ये जाऊन तपासणी केली. पत्नी आणि तिचा प्रियकर तिथे नव्हते. मात्र, बेडमधील चादर विचित्र पद्धतीने फुगलेली दिसली. त्यामुळे नवऱ्याला संशय आला आणि त्याने काही लोकांच्या मदतीने बेड उघडला. बेड उघडताच आतमध्ये लपून बसलेल्या एका तरुणाला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. हा तरुण त्याच्या पत्नीचा प्रियकर होता.
नवऱ्याने त्याला बाहेर काढले आणि त्याची चौकशी केली. पतीला आपल्या घरात पत्नीचा प्रियकर आढळल्यामुळे त्याचा राग अनावर झाला. व्हिडीओमध्ये पती आणि त्याच्यासोबत असलेले काही लोक त्या तरुणाला बेडच्या बाहेर काढून मारहाण करताना दिसत आहेत. काहीजण त्याला काठीने मारत आहेत, तर काहीजण ओरडत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रियांचा पूर
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. "आधीच प्रेमसंबंध असतील तर लग्न का करता?" असा सवाल एका युजरने विचारला आहे. तर, दुसऱ्या एका युजरने "अरे हा तर माझ्या गावचा आहे." असे म्हटले आहे. आतापर्यंत ७ लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
Web Summary : A husband, suspecting infidelity, discovered his wife's lover hidden inside their bed. The discovery led to outrage, with the husband and others assaulting the man. The shocking incident has gone viral, sparking varied reactions online.
Web Summary : शक होने पर पति ने पत्नी के प्रेमी को बिस्तर में छिपा पाया। गुस्से में पति और अन्य लोगों ने उस आदमी पर हमला कर दिया। इस घटना का वीडियो वायरल हो गया है, जिस पर तरह-तरह की प्रतिक्रियाएं आ रही हैं।