शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Viral : नोकरीसाठी सीव्ही पाठवला, अवघ्या ६ मिनिटांतच थेट नकार आला! कारण ऐकून तुम्हीही विचारात पडाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:20 IST

एका डेव्हलपरने रिक्रूटरला सीव्ही पाठवल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत त्याला नकार कळवणारा ईमेल आला.

नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर उत्तराची वाट पाहत आठवडे किंवा महिने घालवावे लागणे, हा अनुभव अनेकांनी घेतला असेल. पण, कोलकाता येथील एका डेव्हलपरच्या बाबतीत याच्या अगदी उलट घटना घडली आहे. त्याने आपला सीव्ही पाठवल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत त्याला नकार कळवणारा ईमेल आला. या सर्वात जलद रिजेक्शनमुळे दुःखी होण्याऐवजी, त्याने रिक्रूटरच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि हायअरिंग प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

रात्री ११.४७ ला सीव्ही, ११.५३ ला रिजेक्शन!

कोलकाता येथील कृष्णव कनोई नावाच्या या डेव्हलपरने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली पोस्ट शेअर केली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने एका हायरिंग कॉन्टॅक्टला रात्री ११ वाजून ४७ मिनिटांनी आपला रिझ्युमे ईमेल केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अवघ्या सहा मिनिटांत, म्हणजेच रात्री ११ वाजून ५३ मिनिटांनी त्याला लगेच उत्तर आले. रिक्रूटरने अत्यंत विनम्र भाषेत आणि थेट उत्तर दिले, "आम्ही सध्या अधिक अनुभवी डेव्हलपरच्या शोधात आहोत. तुम्ही करत असलेले उत्तम काम सुरू ठेवा. शुभेच्छा!"

'फालतू फॉलो-अप' करण्याची वेळ वाचली

सामान्यतः, नोकरीसाठी अर्ज नाकारल्यानंतर लोक नाराज होतात. मात्र, कृष्णव कनोई याने या रिजेक्शनकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. त्याने या तत्काळ उत्तरासाठी रिक्रूटरचे कौतुक केले. कनोई म्हणाला, "रिक्रूटरच्या या प्रामाणिकपणामुळे माझा खूप वेळ वाचला. उत्तर कधी येईल, या विचारात फालतू फॉलो-अप करण्याची किंवा आठवडे वाट बघण्याची गरज उरली नाही."

नोकरी शोधणाऱ्या अनेक उमेदवारांना 'घोस्टिंग' या समस्येचा सामना करावा लागतो. घोस्टिंग म्हणजे, अर्ज केल्यानंतर कंपन्यांकडून कोणतेही उत्तर न मिळणे आणि अचानक संपर्क तोडणे. रिक्रूटरच्या या पारदर्शक आणि जलद प्रतिसादामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

सोशल मीडियावर युजर्सकडून कौतुकाचा वर्षाव

कनोईची ही पोस्ट धडाक्याने व्हायरल होत असून, हजारो युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “लवकर रिजेक्शन मिळणे हा एकप्रकारे वरदानच आहे, कारण यामुळे आठवड्यांचे निरर्थक वाट बघत राहण्याची कटकट वाचली. ही प्रक्रिया अशीच सामान्य व्हायला हवी.” रिक्रूटरने दाखवलेला हा पारदर्शकपणा प्रत्येक कंपनीने अंगीकारायला हवा, असे मत अनेक नेटिझन्सनी व्यक्त केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Job Application Rejected in 6 Minutes: Honesty Appreciated!

Web Summary : A developer received a job rejection email just six minutes after sending his CV. He praised the recruiter's honesty and quick response, highlighting the value of transparency in hiring. The incident sparked online discussion about efficient communication.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेViral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडिया