सध्याच्या काळात भयंकर ट्राफिक टाळण्यासाठी मेट्रोचा प्रवास करणं अनेकांना सोयीस्कर वाटत आहे. मेट्रोचा प्रवास अगदी जलद गतीने आणि थंडगार वातावरणात होतो. मात्र, याच सोयीस्कर वाटणाऱ्या मेट्रोमध्ये कधी कधी असे काही प्रकार पाहायला मिळतात, जे सोशल मीडियावर देखील व्हायरल होतात. कधी कोणी मेट्रोमध्ये नाचून किंवा गाणे गाऊन व्हायरल होतो, तर कधी मेट्रोतील हाणामारीचे व्हिडीओ चर्चेत येतात. आता देखील सोशल मीडियावरदिल्ली मेट्रोतील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन लोक एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. एका व्यक्तीने दुसऱ्याला चप्पल मारल्याने ही वादावादी सुरू होते, त्यानंतर दुसरा व्यक्ती त्याच्या कानशिलात लागावतो. हळूहळू दोघे एकमेकांना लाथाबुक्क्या आणि चपलेने मारू लागतात. या व्हायरल व्हिडीओने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'adv_soyyab' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला मजेदार पद्धतीने कॅप्शन दिले गेले आहे. 'आज पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमध्ये आपले स्वागत आहे. आज एका वेगळ्या प्रकारचा हंगाम सुरू झाला आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी कृपया तो आरामात पहा, सर्वांना हसण्याची भरपूर संधी दिली जाईल', असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, 'दिल्ली मेट्रोमध्ये दररोज काही ना काही मनोरंजनात्मक कंटेंट असतो', तर दुसऱ्याने लिहिले की, 'या लोकांनी सार्वजनिक ठिकाणांना कुस्तीच्या रिंगणामध्ये रूपांतरित केले आहे'. आणखी एका युजरने लिहिले की, 'केवळ दिल्ली मेट्रोमध्येच नाही, तर सध्या अशा घटना अनेक ठिकाणी घडत आहेत भाऊ'. दुसऱ्याने लिहिले आहे की, 'दिल्ली मेट्रो आता प्रवासापेक्षा मनोरंजनाचे क्षेत्र बनले आहे. दररोज एक नवीन शो, एक नवीन नाटक आणि हसण्याचे एक नवीन निमित्त असते'.