शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याने प्राध्यापिकेसोबत वर्गातच उरकलं लग्न? नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:13 IST

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  नादिया जिल्ह्यातील हरिघाटा येथील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मानसशास्त्र वर्गात एका प्राध्यापीकेने विद्यार्थ्यासोबत वर्गातच लग्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.  विद्यार्थी पहिल्या वर्षातच शिकत आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थी एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घालतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

धक्कादायक! दोन दिवसांच्या बाळाला एक्सपायर ग्लुकोज दिले, मृत्यू झाला; दोन नर्स निलंबीत

सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे लग्न खरे आहे की मजेत फोटो आणि व्हिडीओ काढले आहेत? अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने यावर कारवाई केली आहे. त्या विभागाच्या विभाग प्रमुखांना रजेवर पाठवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या फोटो आणि व्हिडिओमुळे हा गोंधळ उडाला आहे तो अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या हरिघाटा कॅम्पसमधील 'अप्लाईड सायकॉलॉजी' विभागाच्या प्रमुख आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचा आहे.

मंगळवारी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.महिला प्राध्यापकाच्या हातात गुलाबाच्या फुलांचा हार होता. पहिल्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने वर्गातच लग्न केले.त्या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. लग्नात ज्या पद्धतीने कपडे परिधान केले जातात त्या पद्धतीने त्या दोघांनी कपडे परिधान केले होते. ही घटना वर्गातील इतर विद्यार्थ्यांनीही पाहिली. त्यापैकी काहींनी फोटो काढले, काहींनी व्हिडीओ बनवले, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर वादविवाद सुरू झाला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने विभागप्रमुख कम प्राध्यापकांना तात्काळ रजेवर पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. तो विद्यार्थीही बेपत्ता आहे. 

अभिनय असल्याचे दिले स्पष्टीकरण

या घटनेबाबत आता विद्यापीठ प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.  कुलगुरू तापस चक्रवर्ती यांनी सांगितले की, विभागप्रमुखांविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांना वर्गात त्यांच्या वर्तनाचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी त्या प्राध्यापीकेने हा एक अभिनय असल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे कुलगुरुंनी सांगितले.

जर अभिनय होता तर मग विद्यापीठ प्रशासनाने संबंधीत प्राध्यापकांना रजेवर का पाठवले? याबाबचच अजूनही विद्यापीठाने स्पष्टीकरण दिलेले नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके