शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मस्तच! रात्रीत उघडले डीजेवाल्याच नशीब, ड्रीम 11 वरुन जिंकले 1 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 15:38 IST

नशीब कधी कोणाचे उघडेल सांगता येत नाही. कधी श्रीमंत असणारी गरीब होऊन जातात, तर कधी गरीब असणारे अचानक कोट्यधीश होतात. अशीच एक घटना समोर आली आहे.

नशीब कधी कोणाचे उघडेल सांगता येत नाही. कधी श्रीमंत असणारी गरीब होऊन जातात, तर कधी गरीब असणारे अचानक कोट्यधीश होतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणाला  एका रात्रीत 1 कोटी रुपये मिळाले आहेत. ही घटना बिहारमधील आहे. येथील एक तरुण एका रात्रीत करोडपती झाला आहे, याचा आनंद त्याच्या घरच्यांना झाला आहे. 

ही घटना बिहार येथील नवादा जिल्ह्यातील अकबरपूर येथील आहे, येथील एका तरुणाला ड्रीम 11 वर क्रिकेट खेळून त्याला  1 कोटी रुपये मिळाले आहेत.    

VIDEO : बाइक चालवताना तरूणीने वर उचललं समोरचं चाक आणि मग...

नवादा जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरा खुर्द गावातील राजू राम याने ड्रीम 11 मध्ये एक कोटींची रक्कम जिंकली आहे. राजू आपल्या गावात डीजेचे काम करतो आणि एक छोटेसे दुकानही चालवतो. पण रातोरात त्याचे नशीब पालटले आणि आता तो एक कोटीचा मालक झाला आहे.

ड्रीम 11 प्लेइंग अॅपमध्ये गेल्या दीड वर्षांपासून हा गेम खेळत होतो. या गेममध्ये त्याने आधीच सुमारे 85,000 रुपये गुंतवले होते. वेळोवेळी तो कमी प्रमाणात जिंकत होता, पण नशिबाने त्याला साथ दिली आणि त्याने गेम टॅली बोर्डमध्ये प्रथम क्रमांक मिळवून एक कोटी रुपये जिंकले. ज्यावेळी तो हा गेम खेळत होता, त्यावेळी जवळपास 35 लाख लोक एकाच वेळी तो गेम खेळत होते. त्याने ब्रिस्बेन हीट आणि सिडनी थंडर संघातील खेळाडूंची निवड करून संघ बनवला आणि जिंकून एक कोटी जिंकले.

रक्कम जिंकल्यानंतर त्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. मात्र त्याची विजयी रक्कम खात्यावर जमा होताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झाला. तो डीजेचा छोटासा व्यवसाय करतो आणि आता जिंकलेल्या पैशातून तो आपला व्यवसाय वाढवणार आहे. सध्या कराची रक्कम वजा करून राजूला  70 लाखांची रक्कम जमा झाली आहे.     

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके