शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

'झुनझुनवाला प्रसन्न', 'हर्षदलाल मेहता प्रसन्न'; शेअर मार्केट गुंतवणूकदाराची भन्नाट लग्नपत्रिका पाहिलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:18 IST

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. लग्नातील अनेक भन्नाट किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, काही दिवसापूर्वी कोल्हापूरातील एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल झाली होती, यात कोल्हापुरी रांगड्या भाषेत लग्नपत्रिका लिहिली होती. आता अशीच एक पत्रिका व्हायरल झाली आहे. यात शेअर मार्केटच्या थीमवर पत्रिका छापली आहे. 

ही लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर हायरल होत आहे. यामध्ये सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीची पातळी पाहून अनेकांनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. यापूर्वी पेटीएमपासून ते व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम पॅटर्नपर्यंत अनेक आश्चर्यकारक लग्नपत्रिका व्हायरल होताना दिसल्या आहेत. अलीकडेच, एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसली, जी शेअर बाजाराच्या थीमवर बनवण्यात आली आहे. ही लग्नपत्रिका नांदेडमधील आहे.

ही लग्नपत्रिका पाहता हे डॉक्टर शेअर मार्केटचे मोठे फॅन असल्याचे दिसून येत आहे. यावरून प्रभावित होऊन त्यांनी आपल्या लग्नाची पत्रिका भन्नाट पद्धतीने डिझाइन केली आहे. ज्यात हर्षद मेहता या शेअर मार्केटमधील प्रसिद्ध नावाला देवाचा दर्जा दिला आहे. लग्नपत्रिकेच्या सुरुवातीला देवाच्या नावाऐवजी झुनझुनवाला, वॉरन बफे आणि हर्षद मेहता यांची नावे लिहिली आहेत.

यासोबतच कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेचा उत्तम वापर लग्नपत्रिकेमध्ये करण्यात आला आहे. लग्नपत्रिकेत वधू आणि वर दोघांनाही संस्थेचे नाव सांगितले आहे तसेच लग्न समारंभात सहभागी होणारे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना गुंतवणूकदार म्हणून सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल झाली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्नViral Photosव्हायरल फोटोज्