शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

Viral Menu card: अजब-गजब मेन्यूकार्ड!! खाण्याच्या डिशची नावं- कुछ नहीं, कुछ भी अन्.. किमतीही तितक्याच अफलातून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:35 IST

तुम्हालाही हॉटेलमध्ये जाऊन काय खायचं असा प्रश्न पडत असेल ना... मग हे नक्की पाहा

Viral Menu card: जेव्हा जेव्हा आपण मित्र आणि कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा जेवणाची ऑर्डर देताना आपल्या सर्वांना खाण्याच्या मेनूबद्दल विचारतो. मेनूमध्ये इतके पर्याय असतात की त्यात काय खावं नि काय वगळावं असा आपलाच गोंधळ होतो. मेनू कार्डवरील पर्याय जितके जास्त तितका आपला गोंधळ वाढतो. पण आता ग्राहकांच्या मदतीसाठी आणि सर्व गोंधळलेल्या ग्राहकांना मदत करण्यासाठी एका रेस्टॉरंटने एक 'हटके' मार्ग आणला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटच्या मेनूमधून Mps किचन स्पेशल नावाचा एक विशेष विभाग दिसत आहे. त्यात हा 'हटके' मेन्यू आला आहे.

रेस्टॉरंटचा 'जरा हटके' मेन्यू इंटरनेटवर व्हायरल

एका रेस्टॉरंटमध्ये वेगळ्या पद्धतीने रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांची यादी देण्यात आली आहे. ती यादी लोकही थक्क झाल्याचे दिसत आहेत. आपण मेनूमध्ये पाहू शकता की, पर्यायांवर धक्कादायक नावे लिहिलेली होती. लोकांनी पाहिले - "220 रुपयांमध्ये कुछ नहीं (काहीही नाही), 240 रुपयांमध्ये कुछ भी (काहीही नाही), 260 रुपयांमध्ये your wish (तुमची इच्छा) आहे, 280 रुपयांमध्ये नहीं तुम बोलो, 300 रुपयांमध्ये मैं नहीं नहीं तुम बोलो, 350 रुपयांमध्ये बाबा जी का ठुल्लू." मेनू कार्डच्या खाली लिहीले आहे की- "तुमचा आहार एका बँकेच्या खात्याप्रमाणे आहे, चांगले अन्न निवडणे ही चांगली गुंतवणूक असते." अन् व्हिडिओचे कॅप्शन आहे- "परफेक्ट मेनूचा काही फरक पडत नाही."

पोस्ट पाहिल्यानंतर लोकांच्या भन्नाट कमेंट्स

बर्‍याच इंस्टाग्राम वापरकर्त्यांना मेनू मजेदार वाटला आणि हसणाऱ्या इमोजींनी कमेंट केल्या. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या शहरात असलेल्या रेस्टॉरंटचा मेनू देखील ओळखला आणि त्यापैकी एक म्हणाला, "ये तो हमारे रायपूर का है." दुसर्‍या व्यक्तीने रेस्टॉरंटचे नाव "रायपूर एमपी ढाबा" असे ठेवले. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, "अद्भुत मेनू कार्ड, मी ऑर्डर करू का की केवळच हसतच राहू." सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून अपलोड केल्यापासून हा व्हिडिओ ८ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेhotelहॉटेलViral Photosव्हायरल फोटोज्