शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:44 IST

भर रस्त्यात सुरू असलेल्या एका हाय-व्होल्टेज फॅमिली ड्रामाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भर रस्त्यात सुरू असलेल्या एका हाय-व्होल्टेज फॅमिली ड्रामाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने तिच्या पती आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण केली आहे. ही घटना महाराजपूर पोलिस स्टेशन परिसरातील नरवाल मोडजवळ घडली. मंगळवारी एका हॉटेलबाहेर पती, पत्नी आणि पतीच्या कथित प्रेयसीमध्ये जोरदार वाद झाला. हा हाय-व्होल्टेज ड्रामा जवळजवळ एक तास सुरू होता.

महाराजपूरमधील एका गावात राहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, तिचे लग्न २०१८ मध्ये झाले होते आणि तिला तीन मुले आहेत. तर, तिचा राजकोटमध्ये राहून काम करत होता. तिचा पती दिवाळीसाठी दोन दिवस आधीच घरी परतला होता. मंगळवारी सकाळी तो त्याच्या कथित प्रेयसीला भेटण्यासाठी नरवाल मोरे येथील एका हॉटेलमध्ये गेला होता. पतीवर संशय आल्याने पत्नी देखील त्याच्या मागे हॉटेलमध्ये गेली. यावेळी तिने आपल्या पतीला प्रेयसीसोबत हातात हात घालून हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले, ज्यामुळे ती प्रचंड संतापली.

पत्नीने आरोप केला की, तिचा पती गेल्या तीन वर्षांपासून त्या महिलेसोबत प्रेमप्रकरण करत होता आणि तिने त्यांना यापूर्वी अनेक वेळा रंगेहाथ पकडले होते. आता देखील दोघांना हॉटेलबाहेर बघितल्यावर तिचा पारा चढला आणि हॉटेलबाहेरच त्यांची बाचाबाची सुरू झाली. दोन्ही बाजूंमधील शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. पत्नीने पतीच्या मैत्रिणीलाच मारहाण केली नाही तर, दोघींचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला देखील तिने मारहाण केली. 

या घटनेदरम्यान, दोन्ही महिलांनी एकमेकींचे केस ओढले. भर रस्त्यात या कुटुंबाची हाणामारी सुरू होती. हा गोंधळ पाहण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्यांची गर्दी जमली आणि काहींनी या घटनेचे चित्रीकरणही केले.

यावेळी घटनास्थळी पोलीस अधिकारी देखील होते. तब्बल एक तास हा गोंधळ सुरू राहिल्यानंतर, रस्त्याने जाणाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली आणि पतीला तेथून हाकलून लावले. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही. या व्हायरल व्हिडीओची चौकशी केली जात आहे आणि तक्रार आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife thrashes husband and girlfriend in public; video goes viral.

Web Summary : In Kanpur, a wife caught her husband with his girlfriend outside a hotel. Enraged, she confronted them, leading to a public brawl. The wife physically assaulted both her husband and his girlfriend. Police are investigating the viral video, awaiting a formal complaint.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल