शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

Video: धन्य ते मुंबईचे रस्ते.... स्पीड ब्रेकरवर अडकली आलिशान जग्वार कार.. अखेर सामान्य मुंबईकरच आले मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 17:13 IST

मुंबईच्या रस्त्यावर जग्वार कारला मारावा लागला धक्का... व्हिडीओ व्हायरल

Car stuck on Speed breaker of Mumbai Rods, Viral Funny Video: वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकरचा वापर केला जातो. पण हल्ली काही ठिकाणी रस्त्यावर असे स्पीड ब्रेकर दिसतात, जे वेग कमी करण्याऐवजी वाहनांचे नुकसान करतात. काही वेळा काही 'धोकादायक स्पीड ब्रेकर'मुळे अपघातही होतात. अशीच एक ताजी घटना मुंबईची आहे. मुंबईतील एका भागात रस्त्यावर असे स्पीड ब्रेकर बनवण्यात आले होते की त्यावर जग्वार कंपनीची आलिशान कारच अडकली. रस्त्यावर कार विचित्रपणे अडकल्याने ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण होऊ लागली. अशा स्थितीत चालकाला मदत करण्यासाठी अखेर मुंबईकरांनी जोर लावला आणि सगळ्यांनी कारला धक्का दिल्याने  जग्वार कार स्पीड ब्रेकरवरून पुढे गेली.

हा व्हिडिओ २७ फेब्रुवारी म्हणजे दोन दिवसांपूर्वीच @RoadsOfMumbai या ट्विटर हँडलने पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - लोक मुंबईत लक्झरी वाहने का खरेदी करतात? त्यासोबत त्याने या घटनेबाबतही स्पष्ट शब्दांत सांगितले. त्याने पोस्ट केलेल्या या क्लिपला आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि भरपूर लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी विचारले की आर्थिक राजधानीत चांगले रस्ते का नाहीत? दरम्यान हा व्हिडिओ मूळतः इंस्टाग्राम युजर 'सिड शर्मा' (simplysid08) ने पोस्ट केला, तो इंटरनेटवर एक ट्रेंडिंग विषय बनला. पाहा तो व्हिडीओ-

हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक म्हणाले की, भारतातील रस्ते आलिशान वाहनांसाठी केव्हा सुयोग्य होतील माहिती नाही. तर काही युजर्सनी सांगितले की, त्यांच्या परिसरातही असे स्पीड ब्रेकर आहेत, ज्यामुळे त्यांच्या वाहनाचे अनेक वेळा नुकसान होते. एका व्यक्तीने सांगितले की, दुबईचे रस्ते लक्झरी कारसाठी सर्वोत्तम आहेत. त्याचप्रमाणे अनेकांना, कार अडकल्यावर लोक मदतीसाठी एकत्र आले हे पाहून खूप आनंद झाला, हेच मुंबईकरांचे स्पिरीट आहे असे अनेकांनी लिहिले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलcarकारMumbaiमुंबई