शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

न रडल्यास १०० रुपये, नियम पाळल्यास बोनस; सहा वर्षांच्या मुलाचा वडिलांसोबत करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:35 IST

स्वाक्षरीही घेतली, सोशल मीडियावर व्हायरल होतोय चिमुकल्याचं गंमतीशीर करारपत्र

नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या मुलाशी किंवा तुमच्या आई-वडिलांशी कधी करार केला आहे? नसेल तर हा करार एकदा वाचून घ्याच.. त्यातल्या अटी, नियम आणि गोष्टी वाचून हैराण व्हाल. सहा वर्षांच्या चिमुकल्याशी झालेला हा करार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे त्यावर पालक आणि मुलाचीही स्वाक्षरी आहे.हे वेळापत्रक नेमके कोणी पोस्ट केले हे कळू शकलेले नाही. सर्वच पालकांना मुलाच्या भवितव्याबद्दल चिंता असते, त्याला चांगल्या सवयी लागाव्या यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात. त्यामुळेच हे प्रकरण नेमके काय आहे, या उत्सुकतेपोटी हा करार सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

करार सोशल मीडियात व्हायरल ‘मी आणि माझ्या सहा वर्षांच्या मुलाने त्याच्या दैनंदिन वेळापत्रकासाठी व कार्यप्रदर्शनाशी संलग्न बोनससाठी आज स्वाक्षरी केली आणि करार केला,’ अशा आशयाच्या मजेशीर कॅप्शनसह हे टाइम-टेबल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

  • अलार्मची वेळ सकाळी ७.५० व अंथरुणातून बाहेर येण्याची वेळ ८.०० पर्यंत 
  • किती वाजता उठायचे, नाश्ता, अंघोळ याच्या वेळा ठरलेल्या, अभ्यास किती वेळ आणि झोपण्याची वेळ निश्चित

 न रडल्यास बक्षीस!वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करून न रडता, न किंचाळता, न भांडण करता एक दिवस घालविल्यास १० रुपयांचं बक्षीस.सलग ७ दिवस याचं पालन केल्यास रुटीनमध्ये १०० रुपयांचे बक्षीसदेखील ठेवण्यात आले आहे.

ब्रश, नाश्ता, साफसफाई, टीव्ही पाहणे, फळे खाणे, खेळणे, दूध पिणे, टेनिस खेळणे, गृहपाठ करणे, रात्रीचे जेवण, झोपण्याची वेळ, इत्यादींबाबतही वेळ ठरलेली आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल