सोशल मीडियावर दररोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होतात, पण काही व्हिडीओ असे असतात जे सगळ्यांनाच धडा शिकवून जातात. सध्या असाच एका जत्रेतील अपघाताचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे, जो पाहिल्यानंतर लोक हादरून गेले आहेत. एकीकडे धमाल सुरू असताना, अचानक झालेल्या या अपघातामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले.
ब्रेक डान्स झुल्यात थरार!
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मोठा 'ब्रेक डान्स' वेगाने फिरताना दिसत आहे. लोक या झुल्यात बसून मोठ्या उत्साहात ओरडत आहेत. तरुणाईचा जोश आणि मुला-बाळांचा किलबिलाट स्पष्टपणे ऐकू येत आहे. मात्र, याच आनंदी वातावरणात अचानक असा धक्कादायक अपघात घडला, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
अचानक घडला अपघात
ब्रेक डान्स झुल्याची एक कार अचानक दचका बसून आपले संतुलन गमावते आणि धडाम आवाज करत आडवी पडते. या कारमध्ये दोन तरुण बसलेले होते. कार तुटताच हे दोन्ही तरुण वेगाने फिरणाऱ्या फ्लोरवर पडले. फ्लोरचा वेग इतका जास्त होता की, ते पडल्याबरोबर फरपटत आणि घासत दूरपर्यंत ओढले गेले. हे दृश्य इतके भयानक होते की, आजूबाजूला असलेले लोक मोठ्याने किंचाळले.
हा अपघात इतका अचानक घडला की, काही क्षणांसाठी तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघात होऊनही झूला सुरूच होता, पण लोकांचा आरडाओरडा ऐकून ऑपरेटरने तत्काळ झूला थांबवण्याचा प्रयत्न केला. ब्रेक डान्स थांबताच लोकांनी तातडीने त्या तरुणांच्या दिशेने धाव घेतली आणि फ्लोरवर उतरून त्या दोघांनाही बाहेर ओढून काढले.
निष्काळजीपणाही जीवघेणा
सुदैवाने, खाली कोसळलेल्या दोन्ही तरुणांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. पडल्यामुळे आणि फरपटल्यामुळे त्यांना हलक्या खरचटल्याच्या जखमा झाल्या, पण त्यांचा जीव वाचला.
Web Summary : A breakdance ride malfunctioned at a fair, throwing riders onto the spinning floor. Though injured, both survived. The shocking video highlights ride safety concerns.
Web Summary : एक मेले में ब्रेकडांस झूला खराब हो गया, जिससे सवार घूमते हुए फर्श पर गिर गए। घायल होने के बावजूद, दोनों बच गए। चौंकाने वाला वीडियो सवारी सुरक्षा चिंताओं पर प्रकाश डालता है।