शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! मॉल आउटलेटमध्ये विकलं जात आहे बासमती तांदळाच्या पोत्याचं जॅकेट, किंमत पाहून उडेल झोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:51 IST

Viral Video : तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की, तांदळाच्या पोत्यापासून एक जॅकेट बाजारात विकायला आलं आहे.

Viral Video : फॅशनच्या विश्वात सतत काहीना काही नवीन प्रयोग होत असतात. कधी हे प्रयोग लोकांना आवडतात, तर कधी त्यावर संतापही व्यक्त केला जातो. तर कधी कधी अशीही फॅशन समोर येते ज्याबाबत लोक विचारात पडतात. सोशल मीडियावर विचित्र फॅशन ट्रेंड्सचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. बरं फॅशन तर अजब असतेच, तरीही त्यांची किंमत इतकी असते की आकडा बघून झोप उडावी. असाच एक फॅशन प्रयोग सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की, तांदळाच्या पोत्यापासून एक जॅकेट बाजारात विकायला आलं आहे.

फॅशनच्या विश्वात होणारे प्रयोग फारच अजब असतात, जे मॉल्स आणि फॅशन आउटलेट्समध्ये बघायला मिळतात. लोकांना वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे घालणं आवडतं. पण कधी कुणी पोत्यापासून तयार जॅकेट घालेल का? असा प्रश्न पडतो. 

बासमती तांदळाच्या पोत्याचं जॅकेट

या व्हिडिओत जे जॅकेट तुम्हाला दिसत आहे, ते हेच आहे. एक पोतं कापून हे जॅकेट शिवल्याचं दिसत आहे. ज्यावर जाहिराती होती. जॅकेटवर रॉयल लिहिलं होतं आणि ते एका बासमती तांदळाच्या पोत्यापासून तयार करण्यात आलंय. व्हिडिओत एक तरूणी एका आउटलेटमध्ये ठेवलेलं हे जॅकेट ट्राय करताना दिसत आहे.

किंमत वाचून उडेल झोप

व्हिडिओवर आपल्याला 2000 डॉलर म्हणजे 70 हजार रूपये बासमती कोट असं लिहिलेलं दिसत आहे. तरूणी एका दुसऱ्या तरूणीसोबत बोलत आहे. दुसरी अंदाज लावते की, हे बासमतीच्या पोत्यापासून तयार जॅकेट कदाचित 300 डॉलरला असेल. तर तरूणी हसत हसत सांगते की, हे जॅके 2000 डॉलरला आहे.

हा व्हिडीओ इन्स्टावर @thanos_jatt नावाच्या यूजरनं पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 18 लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि 647 लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरनं कॅप्शनमध्ये गमतीनं लिहिलं की, 'लाइनमध्ये पुढील नंबर आशीर्वाद पिठाचा आहे'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके