शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video - "नवरा आणि बॉयफ्रेंडसोबत एकाच घरात राहायचंय"; 3 मुलांची आई विजेच्या खांबावर चढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 12:43 IST

विवाहित महिलेचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचललं. ती थेट विजेच्या खांबावर चढल्याची धक्कादायक घटना घडली.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. विवाहित महिलेचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचललं. ती थेट विजेच्या खांबावर चढल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेला तीन मुलं असून तिचे गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही बाब तिच्या पतीला समजताच त्याने तिला विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर महिला त्याला आत्महत्येची धमकी देऊ लागली.

फ्री प्रेस जर्नलने स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार म्हटलं आहे की, शेजारच्या गावातील एका तरुणासोबतचे महिलेचे प्रेमसंबंध तिच्या पतीने नाकारल्यानंतर महिलेने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. महिनाभरापूर्वी तिने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यापूर्वीही महिलेने रेल्वे रुळ गाठून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. महिलेला नवरा आणि बॉयफ्रेंड या दोघांसोबत एकाच घरात राहायचं आहे. 

महिला विजेच्या खांबावर चढताना दिसली. या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला खांबावरून खाली उतरण्यास नकार देत आहे, तर स्थानिक लोक तिला समजावून पुन्हा खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. वृत्तानुसार, पोलीस पती, पत्नी आणि प्रियकर यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

पतीने आपल्या पत्नीबद्दल पोलिसांना माहिती दिली आणि सांगितलं की, पत्नीला प्रियकरासोबत राहायचं आहे, परंतु कौटुंबिक कारणांमुळे पत्नीला सोडू इच्छित नाही, कारण ती तीन मुलांची आई आहे. तीन मुलांची आई एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि आता ती प्रियकराला देखील त्याच घरात ठेवण्याचा हट्ट करत आहे. पतीने नकार दिल्याने ती संतापली आणि विजेच्या खांबावर चढली, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल