शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

हाये गर्मी..!! तरूणाने भररस्त्यात सुरू केली आंघोळ; पोलिसांना प्रकार समजताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 14:09 IST

ट्रॅफिक सिग्नलवर थांबून त्याने पाण्याने भरलेली बादली डोक्यावर ओतली

boy bathing on road viral video: गेल्या दोन महिन्यांत तापमान खूपच वाढलंय. ऊन्हामुळे साऱ्यांनाच त्रास होतोय. जसाजसा मे महिना संपतोय तसे साऱ्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. मात्र अजून १०-१२ दिवस तरी साऱ्यांना ऊन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे. तमिळनाडूतील एका २४ वर्षीय तरुणाने या ऊन्हाला कंटाळून भररस्त्यात अंघोळ केली. रस्त्यावर आंघोळ करण्यासाठी त्याने १० रुपयांची पैज लावली आणि व्हिडीओ व्हायरल करण्याचे ठरवले. त्याने इरोडमधील पन्नीरसेल्वम पार्क जंक्शनवर आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या या कृतीनंतर पोलीसांनी मात्र त्याच्याबरोबर जे केलं ते साऱ्यांनीच वाचायला हवं.

रस्त्यावर उभं राहून अचानक अंघोळील सुरूवात

जिल्हा पोलिस अधीक्षक जी जवाहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुख नावाच्या व्यक्तीने रविवारी बिजी जंक्शन येथे भररस्त्यात अंघोळ केली. आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या कृतीवर आक्षेप घेतला तेव्हा त्याने दावा केला की तो रणरणत्या उन्हात शांत व थंड होण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याने व्हिडीओ ऑनलाइन अपलोड केला. व्हिडीओ व्हायरल करणं हा त्याचा मूळ उद्देश होता. पण व्हायरल व्हिडीओमुळे तो प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्याच्या या कृत्याची दखल पोलिसांनी घेतली व त्याला अद्दल घडवायचे ठरवले.

वाहतूक पोलिसांनी घडवली अद्दल

व्हिडिओची माहिती मिळताच अधीक्षकांनी वाहतूक पोलिसांना फारुखला दंड आकारण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सोमवारी या तरुणाला त्याच्या कारवाईचा दंड ठोठावण्यात आला. त्याच्या स्टंटने पोलिसांचे लक्ष वेधून घेतले, त्यामुळे त्याला वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल 3,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्येही रस्त्यात आंघोळ करताना मोटारसायकलवरील एक पुरुष आणि एक महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतर काही दिवसांतच हा व्हिडिओ समोर आला आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये ती महिला स्वत:वर आणि पुरुषावर बादलीतून पाणी ओतताना दिसत होती. त्यामुळे अशी चिंता व्यक्त केली जात आहे की अशा बेजबाबदार वर्तणुकीला मनोरंजन का मानले जात आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTamilnaduतामिळनाडू