गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात कोरोनानं धुमाकूळ घातला. दिवसागणिक कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असल्यानं नागरिकांच्या मनात प्रचंड भीती होती. त्यातच चिकन खाल्ल्यानं कोरोना होत असल्याची अफवा पसरली आणि पोल्ट्री व्यवसायिकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यानंतर आता बर्ड फ्लूचं संकट आल्यानं पोल्ट्री व्यवसायिक चिंतेत आहेत. ग्राहकांनी दुकानांमध्ये पाठ फिरवल्यानं व्यवसायिकांना नुकसान सोसावं लागत आहे. मात्र सांगलीतल्या एका कोंबडीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.कोरोना काळात लोकांना बकरीसोबत झूम कॉलची दिली ऑफर, अशीच केली ५० लाख रूपयांची कमाई.....कोणत्याही व्यक्तीला आपला जीव प्रिय असतो, असं म्हणतात. याची प्रचिती व्हायरल व्हिडीओमधून येते. खाटिक कोंबडीला सुरा दाखवून 'तुला कापू का' असं विचारतो. त्यावर कोंबडी 'नको नको' म्हणते. हा व्हिडीओ सांगलीतील दुकानाचा असल्याचं समजतं. अवघ्या ३० सेकंदांच्या या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा आहे. खाटिकाला मान हलवून 'कापू नको' असं सांगणारी कोंबडी तुफान व्हायरल झाली आहे.
VIDEO: तुला कापू का..? कोंबडी म्हणते 'नको, नको'; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 14:09 IST