Snake Viral Video: साप हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. विषारी साप चावल्याने मानव असो वा प्राणी...वेळेवर उपचार न मिळल्यास मृत्यू होतो. पण, साप उगाच कुणाला येऊन चावत नाही. सापाला त्रास दिला, तरच तो हल्ला करतो. कधी-कधी एखादा नशीबवान व्यक्ती सापाच्या हल्ल्यातूनही वाचतो. असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, तो पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही.
सापाने हल्ला केला, पण...व्हायरल व्हिडीओमध्ये एक झोपडीसारखे दिसणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये व्यक्ती आरामात फोनवर बोलत आहे आणि निसर्गाचा आनंद घेत आहे. पण कदाचित त्या व्यक्तीला माहित नसेल की, निसर्गाची दुसरी बाजू खूप धोकादायक आहे. ही व्यक्ती फोनवर बोलत असताना साप त्याच्यावर मागून हल्ला करतो. यातील सर्वात भयावह बाब म्हणजे साप व्यक्तीच्या डोक्यावर हल्ला करतो.
या छोट्याशा गोष्टीमुळे जीव वाचलामात्र टोपीमुळे त्या माणसाचा जीव वाचला. होय, त्या व्यक्तीने डोक्यावर टोपी घातली होती. साप त्याच्यावर हल्ला करतो, तेव्हा सापाचे दात टोपीत अडकतात. साप दात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या डोक्यावरुन टोपी निघते आणि त्यानंतर त्याला साप दिसतो. त्या व्यक्तीने विचारही केला नसेल की, एक साधी टोपी त्याचा जीव वाचवू शकते. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून, लोकांमध्ये तो चर्चेचा विषय बनला आहे.
@AMAZlNGNATURE नावाच्या X अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 7 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. एका यूजरने लिहिले... भावाचे नशीब चांगले होते, नाहीतर त्याला जीव गमवावा लागला असता. दुसऱ्या युजरने लिहिले... इथे साप आणि व्यक्ती दोघेही मूर्ख आहेत. तर दुसऱ्या युजरने लिहिले... अशा ठिकाणी सावधपणे बसावे.