शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Video - "मी कर्मचारी आहे, तुझी नोकर नाही..."; एअर होस्टेस अन् पॅसेंजरमध्ये विमानात तुफान राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 16:05 IST

इंडिगोच्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात झालेल्या जोरदार भांडणाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

इंडिगोच्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात झालेल्या जोरदार भांडणाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. तुर्कीच्या इस्तंबूल शहरातून दिल्लीला येत असलेल्या विमानातील राड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात जेवणावरून जोरदार वाद होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ 16 डिसेंबरचा आहे. यामध्ये भांडणादरम्यान प्रवाशाने एअर होस्टेसला "तुम्ही प्रवाशांचे नोकर आहात’ असं म्हटलं. एअर होस्टेसने देखील यावर प्रवाशाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. "मी एक कर्मचारी आहे, तुमची नोकर नाही..." असं म्हटलं आहे. या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तसेच प्रवाशाने भांडण होत असताना एअर होस्टेसला "तू का ओरडत आहेस? गप्प बस" असं देखील म्हटलं. या संपूर्ण प्रकरणावर अनेकांनी भाष्य केलं असून सोशल मीडिया युजर्सनी एअर होस्टेसची बाजू घेतली आहे. क्रू मेंबर्सचा आदर केला पाहिजे असं म्हटलं आहे.

जेट एअरवेजचे सीईओ संजीव कपूर हे केबिन क्रूच्या बाजूने बोलले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "मी आधी म्हटल्याप्रमाणे, क्रू मेंबर्स देखील माणूस आहेत. त्यांना ब्रेकिंग पॉईंटवर आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली असेल. गेल्या काही वर्षांत मी फ्लाइटमध्ये क्रूला कानाखाली मारताना आणि शिवीगाळ करताना पाहिले आहे. नोकर आणि त्यापेक्षाही वाईट म्हटलं जातं. ती आता बरी आहे अशी आशा आहे" असं म्हटलं आहे.

इंडिगोच्या म्हणण्यानुसार, हा मुद्दा कोडशेअर कनेक्शनद्वारे प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी निवडलेल्या खाद्यपदार्थाशी संबंधित होता. DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेचा शोध घेत आहोत आणि योग्य ती कारवाई केली जाईल. इंडिगोने सांगितले की, "आम्हाला 16 डिसेंबर 2022 रोजी इस्तंबूल ते दिल्ली या फ्लाइट 6E 12 मध्ये घडलेल्या घटनेची माहिती आहे. ही समस्या कोडशेअर कनेक्शनद्वारे प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी निवडलेल्या जेवणाशी संबंधित होती. इंडिगो आपल्या ग्राहकांच्या गरजांबद्दल जागरूक आहे आणि आमच्या ग्राहकांना विनम्र आणि त्रासमुक्त अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही घटनेचा तपास करत आहोत." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :IndigoइंडिगोairplaneविमानSocial Viralसोशल व्हायरल