सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आता Paytm चे संस्थापक विजय शेखर यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करून भारतातील नव्या तंत्रज्ञान कंपन्यांचं कौतुक केले आहे. या व्हायरल व्हिडिओ एक उबेर चालक त्याची महिन्याची कमाई लोकांसोबत शेअर करतो. ही रक्कम ऐकून सर्वच थक्क झाले आहे. एक युवक उबेरमधून महिन्याला ८० हजार रुपयांची कमाई करत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात.
विजय शेखर यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, भारतातील नव्या तंत्रज्ञान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीत क्रांतीकारक बदल घडवून आणलेत. त्यामुळे चांगल्या पगाराच्या लाखो संधी, रोजगार निर्माण झालेत त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळते. फास्ट डिलिव्हरी, लोकल प्रवास आणि प्रत्येक ठिकाणी Paytm QR कोड दिसून येतात. डिजिटल सेवा देण्यासाठी जे सातत्याने मेहनत करतात त्यांचा अभिमान वाटतो असं त्यांनी सांगितले.
या व्हिडिओत काय आहे?
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक प्रवासी आणि उबेर चालक यांच्यातील संवाद ऐकायला मिळतो हा चालक महिन्याला ८० हजारांची कमाई करतो.
उबेर चालक - महिन्याला मी ८० ते ८५ हजारापर्यंत कमावतो.
प्रवासी - फक्त रॅपिडो चालवतो?
उबेर चालक - फक्त उबेरमध्ये
प्रवासी - महिन्याला कितपत कमावतो?
उबेर चालक - ८० हजार रुपये
उबेर चालक - दिवसाला १३ तास काम करून ८० ते ८५ हजार कमावतो, हे लोकांना सांगितले तर ते हसतील, कामावर गेलो तर कमी पैसे देतात
प्रवासी - आम्हीही एवढे कमवत नाही.
उबेर चालक - कंपनीवाले इतके पैसे देत नाहीत, १३ तास काम करतो, मर्जीने काम करतोय, मी स्वत:चा मालिक आहे. मला कुणी बोलणारं नाही. मी आताही काम बंद करून झोपायला जाऊ शकतो.
प्रवासी - चला, बरं वाटलं तुमच्याशी बोलून, चांगले आहे
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो विजय शेखर यांनी पोस्ट केला. त्यावर अनेक नेटिझन्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात एक युजर म्हणतो की, हे खोटं आहे, ८० हजार प्रतिमहिना म्हणजे अंदाजे २०५ रुपये प्रति तास, ८ रुपये प्रतिकिमी दर म्हणजे २६ किमी प्रतितास असायला हवे (सरासरी ४० तास प्रतितास हवा), पेट्रोल खर्च सुद्धा आहे. प्लॅटिना ७० किमी प्रति लीटर चालते, २६ किमी * १३ तास * ३० दिवस = १३६१५ रुपये, कुणालाही इतक्या सातत्याने अँपमधून भाडे मिळत नाही. कमिशन, विश्रांतीची वेळ, पेमेंट हेदेखील लक्षात घ्यायला हवं असं त्याने सांगितले.