शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

VIDEO: मेट्रोत मद्यपान? भरलेला ग्लास तरुणाने केला रिकामा, अंडही खाल्लं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:43 IST

दिल्ली मेट्रोमध्ये एक प्रवासी मद्यपान करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Delhi Metro Viral Video:दिल्लीमेट्रो गेल्या काही दिवसांपासून प्रवासाऐवजी इन्स्टाग्राम रील्सचे केंद्र बनलं आहे. अनेक इन्फ्लुएंसर दिल्लीमेट्रोमध्ये अनेक प्रकारचा कॉन्टेट तयार करतात. यामुळे कधी प्रेक्षकांचे मनोरंजन होते तर कधी व्हिडीओतून येऊ नये म्हणून तोंड लपवावे लागते. प्रशासनाकडून कारवाई होऊनही हे लोक काय थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे आता प्रवाशांचीही भीड चेपली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण दिल्ली मेट्रोमध्ये एक प्रवासी मद्यपान करत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ समोर आला आहे. मेट्रोत बसून एका प्रवाशाने मद्यपान केल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये दररोज लोक असे काहीतरी करताना दिसतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक माणूस मेट्रोत बसून दारू पीत असल्याचा दावा केला जातोय. एवढंच नाही तर त्याने  तिथे अंडे सोलून खाल्ले. ती व्यक्ती उघडपणे डीएमआरसीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. समोर बसलेल्या एका प्रवाशाने त्याच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रवाशावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

व्हिडिओ कधीचा आणि कोणत्या मेट्रो मार्गाचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सीटवर बसलेली आहे. सर्वप्रथम ती व्यक्ती आपल्या बॅगेतून अंड बाहेर काढतो. अंड सोलण्यासाठी त्याने मेट्रोमधील कॅच रॉड पाईपचा वापर केला. पाईप रॉडवर त्याने अंडे आपटले आणि सोलून बाजूला ठेवले. यानंतर तो ग्लास तयार करतो. त्यानंतर ग्लासातील पिवळ्या द्रव पदार्थाचा आस्वाद घेत त्याने अंड खाण्यास सुरुवात केली. मद्यपान झाल्यानंतर त्याने ग्लास आणि अंड्याच्या टरफल्याचा कचरा बॅगेत ठेवला.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओवर यूजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये दारू बंदी असताना तरुणाने ती आतमध्ये कशी आणली, असा सवाल काहीजण विचारत आहेत. तर काही युजर्स तो दारु पिताना कोणाला त्रास देत नाहीये असं म्हटलं. एका युजरने  या व्हिडिओमध्ये काय चूक आहे? कोणी शांतपणे समजावून सांगेल का? त्याने काही ड्रिंक्स प्यायले आणि कोणाला त्रास न देता उकडलेले अंडे खाल्ले, काही गडबड तर केली नाही ना? याचा लोकांचा राग का येतोय? असा सवाल केला. आणखी एका युजरने दिल्ली मेट्रो आणि दिल्ली पोलिसांनी याची दखल घेऊन योग्य ती शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.

समोर आलं सत्य

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती प्रत्यक्षात ॲपी फिज पीत होती. सोशल मीडियावर गैरसमज पसरल्यानंतर  त्या व्यक्तीने स्वत: सांगितले की तो ॲपी फिज पीत आहे. हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामच्या फूड रिपब्लिक इंडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता.

टॅग्स :delhiदिल्लीMetroमेट्रोSocial Viralसोशल व्हायरल