(Image Credit : Youtube/burnhamonsea)
गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी तरूण मंडळी इतक्या भन्नाट आयडियाच्या कल्पना लावतात की, त्यावर कधी कधी विश्वासही बसत नाही. कोणी डोंगराच्या टोकावर जातो, तर कोणी इमारतीवर चढून त्याच्या मनातील गोष्ट सांगतो. मात्र, ब्रिटनमध्ये स्टीवन काहिल नावाच्या तरूणाने त्याच्या गर्लफ्रेन्डला लग्नासाठी केलेला प्रपोज फारच वेगळा आणि फिल्मी आहे.
स्टीवनला त्याचा हा प्रपोज नेहमीसाठी स्मरणात राहील असाच करायचा होता. त्यामुळे त्याने त्याच्या आवडीचा हॉलिडे स्पॉट सोमरसेट बीच निवडला. इथे त्याने एका सॅंड आर्टिस्टच्या मदतीने ८५ मीटर रूंद एक सॅंड आर्ट तयार केलं आणि त्यावर 'Will you marry me Hidi?' असं लिहीलं.
स्टीवनने हीदीला याबाबत काहीच कल्पना दिली नव्हती. तो तिला तिचे डोळे बंद करून त्या ठिकाणी घेऊन गेला आणि तिला हळूहळू डोळे उघडण्यास सांगितले. हीदीने जसेही डोळे उघडले, समोरचा नजारा पाहून ती थक्क झाली. ती काही बोलणार इतक्यात स्टीवनने गु़डघ्या बसून तिला लग्नासाठी विचारणा केली.
स्टीवनने सांगितले की, 'हीदी त्यावेळी फारच भावूक झाली होती'. तिला जराही अंदाज नव्हता की, स्टीवन लग्नासाठी अशाप्रकारे प्रपोज करेल. स्टीवन आणि हीदी नेहमीच सुट्टीत फिरण्यासाठी सोमरसेट जातात, पण यावेळी हीदीला अजिबात अंदाज नव्हता की, या सुट्टीत तिला इतकं सुंदर सरप्राइज मिळेल.
मीडिया रिपोट्सनुसार, हीदीने स्टीवनचं प्रपोजल स्विकारलं आणि लग्नासाठी होकार दिला. लवकरच दोघे लग्न करणार असून ते लग्नाच्या तयारीला सुद्धा लागले आहेत.