Viral Video News: रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याला धडक दिल्यामुळे एका कारचालकाचं चांगलंच नुकसान झालं. हे नुकसान केलं, ते कारची बसलेल्या कुत्र्यानेच! हे तेव्हा समोर आलं ज्यावेळी कारमालकाने कार पार्किंगमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले. नेमकं काय घडलं?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना घडली आहे मध्य प्रदेशातील सागर शहरात. प्रल्हाद सिंह घोसी हे शहरातील तिरुपती पुरम कॉलनीमध्ये राहतात. १७ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या कुटुंबासह एका लग्नासाठी निघाले.
घरापासून ५०० मिटर अंतर गेल्यानंतर त्यांनी गाडी वळली. यावेळी अचानक घोसी यांच्या कारची कुत्र्याला धडक बसली. कुत्रा रस्त्याच्या कडेला बसलेला होता. धडक बसल्याने कुत्रा किरकोळ जखमी झाला.
रात्री येऊन कारचे केले नुकसान
दरम्यान, धडक बसल्यानंतर कुत्र्याने भुंकत कारचा लांबपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर काळ निघून गेला. घोसी आणि त्यांचं कुटुंब रात्री १ वाजता घरी आले.
जखमी झालेला कुत्रा रात्री कारजवळ आला. त्याने बोनटवर नखांनी ओरखडे मारले. त्यामुळे कारचे दर्शनी भागच विद्रुप दिसू लागला.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घोसी यांनी कार बघितली, तेव्हा त्यांना हे ओरखडे मारलेले दिसले. त्यांना आधी वाटलं की, खोडसाळ मुलांनी हे केलं असेल. पण, हे नेमकं कोणी केलं आहे, पाहण्यासाठी जेव्हा त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तेव्हा कुत्रा दिसला.